Narayan Rane | ED च्या कारवाईनंतर नारायण राणे यांचा CM उद्धव ठाकरेंना इशारा; म्हणाले – ‘आगे आगे देखिए होता है क्‍या’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Narayan Rane | गेल्या काही महिन्यापासून केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईमुळे राज्यातील राजकारणात वादंग निर्माण झाला आहे. मंगळवारी सक्तवसुली संचालनालयाने (ED) राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्यावर कारवाई केल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात पुन्हा खडाजंगी पाहायला मिळत आहे. ईडीच्या या कारवाईवरून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

 

ईडीने (ED) मुख्यमंत्री ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातील 11 सदनिका जप्त केल्या आहेत. पाटणकर यांच्या साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडच्या या कंपनीच्या मालकीच्या या सदनिका होत्या. हमसफर कंपनीकडून विनातारण पाटणकर यांच्या कंपनीला कर्ज देण्यात आलं होते. याच प्रकरणी ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे.

 

 

यावरुन बोलताना नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले की, ”महाराष्‍ट्रात भ्रष्‍टाचाराने कळस गाठलाय. जनतेचे शोषण होत आहे. सूडबुद्धीने कारवाया होत आहेत. यालाच म्‍हणतात चोराच्‍या उलट्या बोंबा. सव्वा दोन वर्षांत महाराष्‍ट्राच्‍या शेतकऱ्यांना, एसटी कर्मचाऱ्यांना काय मिळाले? त्‍यांच्‍या नशिबी आत्‍महत्‍या,” अशी टीका त्यांनी केली. त्याचबरोबर ‘आगे आगे देखिए होता है क्‍या’ असं देखील राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

”आप्‍तांच्‍या तिजोऱ्यांमध्ये मात्र कोट्यवधींची भर.
ही संपत्‍ती कुठून आली? कोणाकडून आणली?
शिवसैनिकांच्‍या वाट्याला यातील काहीही नाही.
सत्‍ता फक्‍त आपण आणि आपल्‍या नातेवाईकांसाठीच,” असं देखील नारायण राणे यांनी कडक शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 

Web Title :- Narayan Rane | BJP leader and union minister narayan rane has warned maharashtra chief minister uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा