Narayan Rane | नारायण राणे यांची उध्दव ठाकरेंवर बोचरी टीका; म्हणाले – ‘अस्तित्व आहेच कुठे?… ते फक्त मातोश्रीच्या कक्षेत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) वाढदिवशी काल भारतात नामिबिया वरून चित्ते (Cheetah) आणण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी यावरुन मोदी सरकारचा चित्ता सरकार असा उल्लेख केला. ठाकरेंच्या या टोमण्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी जोरदार प्रहार केला आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे चांगली वाक्य नसतील, तर त्यांनी मला फोन करावा. त्यांना चांगलं बोलताच येत नाही, माझ्याकडे आहेत. चांगल्या गोष्टीचं कौतुक कराव, अशी टीका नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली.

 

उद्धव ठाकरे यांचे अस्तित्व आहेच कुठे?… ते फक्त मातोश्रीच्या कक्षेत असं म्हणत नारायण राणे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली. जे चित्ते उपलब्ध नव्हते ते पंतप्रधान मोदी यांनी उपलब्ध करुन दिले. त्यामुळे त्यांचे धन्यवाद मानले पाहिजे. पण काही लोकांना चांगलं बोलता येत नाही, असा खोचक टोला राणे (Narayan Rane) यांनी लगावला.

 

कोकणात नाणार रिफायनरी (Nanar Refinery) होणार. कोणाचाही विरोध चालू देणार नाही असंही म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांचं अस्तित्व आहेच कुठे? ज्या दिवशी ते मुख्यमंत्री पदावरुन पायउतार झाले त्याच दिवशी त्यांचं अस्तित्व संपले. त्यांचे अस्तित्व फक्त मातोश्रीपुरतं मर्यादित होतं. राज्यात देशात उद्धव ठाकरे यांचं अस्तित्व कुठंही नाही. त्यांचं अस्तित्व फक्त मातोश्रीच्या कक्षेत आहे, असा घाणाघात राणे यांनी केला आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा (Dussehra Melava) शिवाजी पार्कवर घ्यायला शिंदे गटालाच परवानगी मिळेल, तसंच दसरा मेळाव्यावर कोर्टातून निकाल लागेल.
धनुष्यबाणही शिंदेंकडेच राहील, असा विश्वास राणेंनी व्यक्त केला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) हे नागपूर दौऱ्यावर आहेत.
नारायण राणे यांनी त्यांच्या या दौऱ्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

कोकणात नाणार रिफायनरी होणार. नाणार कुठंही बाहेर जाऊ नये, यासाठी मी स्वत: मंत्र्यांना भेटलो.
ते संबंधित कंपनीशी पुन्हा बोलत आहेत. हीच जागा आम्ही कंपनीला द्यायला तयार आहोत, असं राणे यांनी सांगितलं.
नारायण राणे यांनी आज मुंबईत माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

 

Web Title :- Narayan Rane | bjp leader and union minister narayan rane slams shivsena uddhav thackeray and reaction over nanar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | दुर्देवी ! सिंहगडावर सहलीसाठी आलेल्या महाविद्यालयीन तरुणाचा हत्ती टाकीत पडून मृत्यू

CM Eknath Shinde | ‘मैत्रीसोबत क्षमा जोडली की सगळे वाद मिटतात पण…’, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना मागितली टाळी

Shivsena | मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची मोठी खेळी, शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच नवी कार्यकारिणी जाहीर