Narayan Rane | ‘मलाही मारण्यासाठी सुपार्‍या दिल्या, तोंड उघडायला लावू नका’; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा


मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – 
Narayan Rane | एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना नक्षलवाद्यांकडून (Naxalites) जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) आली होती. त्यांच्या हत्येचा कट होता असे मी वाचले. बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) आशीर्वादाने जी-जी माणसे मोठी झाली त्यांना संपवण्याचे कटकारस्थान आजवर कुणी केले? मी शिवसेना (Shivsena) सोडली तेव्हा मलाही मारण्याच्या सुपर्‍या दिल्या होत्या. ज्यांना सुपर्‍या दिल्या त्यांनीच मला सांगितले होते. पण मी गप्प बसलो. आई-वडिलांच्या आशीर्वादाने मी वाचलो. मला तोंड उघडायला भाग पाडू नका, असा गंभीर आरोप भाजपाचे (BJP) केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) यांच्यावर केला.

 

उद्धव ठाकरे यांची सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घेतलेल्या मुलाखतीनंतर भाजपा आणि मनसे (MNS) नेते आक्रमक झाले आहेत. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर शिंदे गटावर (Shinde Group) जोरदार टीकास्त्र सोडले होते. या मुलाखतीनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे यांच्यावर टीका केली.

 

नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरे एक नंबरचे नाटकी असून चार भिंतीत नाटकं करतात. गेली अडीच वर्ष शिवसैनिक (Shiv Sainik) आठवला नाही. जनतेची, हिंदुत्वाची कामे केली नाहीत. स्वत:चे पद एकनाथ शिंदेंना दिल्यामुळे त्यांना पोटशूळ झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी गेल्या अडीच वर्षात कधी शिवसैनिकांशी संवाद साधलाय का? एकातरी शिवसैनिकाला मदत केली का? वारसा काय फक्त रक्ताचा असतो का, वारसा विचारांचा असतो.

राणे पुढे म्हणाले, मुख्यमंत्री असताना घेतलेल्या मुलाखतीत बाळासाहेबांचा फोटो नव्हता.
आजच्या मुलाखतीत बाळासाहेबांचा फोटो वापरला. भावनिक राजकारण करुन लोकांची दिशाभूल करण्याचे काम केले आहे.
बाळासाहेब हयात असताना त्यांना छळण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले.

 

शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना राणे म्हणाले, संजय राऊत आज खूप खुश असतील.
कारण त्यांचे मिशन पूर्ण झाले. त्यांनीच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरुन खाली उतरवले.
माझे गुरु पवार साहेबांनी दिलेले काम मी उत्तमरित्या हाताळले म्हणून संजय राऊत आज समाधानी असतील, असे राणे म्हणाले.

 

Web Title :- Narayan Rane | bjp leader and union minister narayan rane targets
shivsena chief uddhav thackeray over his interview with mp sanjay raut

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा