Narayan Rane | नारायण राणे यांची शरद पवारांना धमकी? म्हणाले – ‘आमदारांच्या केसालाही धक्का लागल्यास घर गाठणे कठिण होईल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Shivsena leader Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक झाली. बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी आमदारांना मुंबईत येऊद्या, त्यातले अनेक आमदार एकनाथ शिंदेंचा पाठिंबा काढून घेतील. तसेच आम्ही बहुमत सिद्ध करु असा दावा केला. तेसच त्यांना मुंबईत तरी यावं लागेल, असे म्हटले होते. यानंतर नारायण राणे (Narayan Rane) यांनी शरद पवार यांना थेट धमकी दिली आहे. नारायण राणे (Narayan Rane) यांनी ट्विट करुन शरद पवार यांच्यावर निशाणा साधाला आहे.

 

शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी थेट शरद पवार यांना धमकी दिली आहे. माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, ‘सभागृहात येऊन दाखवा’, ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लागल्यास घर गाठणे कठिण होईल अशी धमकी त्यांनी पवारांना दिली आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात आणखी काही मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे.

 

 

नारायण राणे यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले की, सन्माननीय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे माझे जुने सहकारी व मित्रही आहेत. ते व त्यांचे सहकारी सरकारमधून बाहेर पडून राज्याबाहेर आहेत. त्यांची संख्या पाहता आताच्या मुख्यमंत्र्यांनी (CM) शोभायात्रा काढली, हा पळपुटेपणा व स्वार्थीपणा आहे, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली.

 

Web Title :- Narayan Rane | BJP leader and union minister narayan ranes threat to ncp chief sharad pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

LIC च्या शेयरमध्ये का टिकत नाही तेजी, जाणून घ्या JP Morgan ने अनालिसिसमध्ये काय म्हटले

 

Sharad Pawar | एकनाथ शिंदेंच्या मागे भाजपाच ! ‘महाविकास’ सरकारसाठी 24 तास महत्वाचे, शरद पवाराचे मोठं वक्तव्य

 

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे यांनी भाजपचा पाठिंबा असल्याचं केलं मान्य, जाहीर केली ही भूमिका