Narayan Rane | नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, म्हणाले- ‘हे दुसऱ्यांना खोके म्हणतात, तुम्ही नाही का घेतले खोके?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे (BJP) केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाचे वैर अनेकवेळा उघडपणे दिसले आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) आणि नारायण राणे (Narayan Rane) यांच्यात मागील काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. शनिवारी एका कार्यक्रमात नारायण राणे यांनी कोकणी शैलीत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ठाकरे गटाकडून शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) ‘खोके सरकार’ म्हणून टीका केली जात आहे. या टीकेला नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले,

 

नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले, हे दुसऱ्यांना खोके म्हणतात, तुम्ही नाही का घेतले खोके? आम्ही काय मातोश्रीवर (Matoshree) गुच्छ घेऊन जायचो का? उद्धव ठकरे सांगतील त्या दिवशी आम्ही काय काय आणि कोणत्या कोणत्या माळ्यावर पोहोचवलं हे सांगेन. आम्हाला बोलायला लावू नका, वयाच्या 15 व्या वर्षापासून मी शिवसेनेत (Shivsena) होतो. जीवाची पर्वा केली नाही. संपादकाचा पगार घ्यायचा आणि नेता म्हणून तोडबाजी करायची? असे काम मी केले नाही, आम्ही शिवसेनेसाठी त्याग केला. उद्धव ठाकरे आयते सत्तेवर अडीच वर्ष बसले, असे म्हणत राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं.

 

हे खासदार आहेत ते माझं पाप

खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल करताना नारायण राणे म्हणाले, संपादक म्हणून चांगलं लिहा. हे खासदार आहेत ते माझं पाप आहे. बाळासाहेबांनी त्यावेळी मला बोलावलं होतं. मी त्यांच्याकडे गेलो होतो, त्यावेळी ते तिकडे बसले होते. संजय राऊतांना खासदार बनवायचंय, उद्या फॉर्म भरायचा आहे, त्याला घेऊन जा आणि खासदार कर असं बाळासाहेबांनी (Balasaheb Thackeray) मला सांगितलं होतं. त्यांच्यासमोर मी कधी नाही म्हटलं नाही. दुसऱ्या दिवशी मी विधानभवनात कागदपत्रं घेऊन बोलावलं होतं, असा दावा नारायण राणे यांनी केला.

 

शिवसेना रडणारी कधीच नव्हती

आज शिवसेनेची काय अवस्था झाली हो. सेनेचे 40 आमदार दिवसाढवळ्या एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde) निघून जातात.
शिवसैनिक उघड्या डोळ्यांनी पाहत बसले. उद्धव ठाकरे रडले की शिवसैनिक रडतात.
शिवसेना रडणारी कधीच नव्हती. त्याला शिवसेना नाही म्हणत. शिवसेना ही लढणारी होती.
आता कुठे गेलं तुमचं सळसळत रक्त? दोन्ही हात सावरुन घोषणा देत होतात,
आता कुठे गेल्या तुमच्या घोषणा, अशा शब्दात राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर प्रहार केला.

 

 

Web Title :- Narayan Rane | bjp leader narayan rane criticized uddhav thackeray over khoke sarkar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा