Advt.

Narayan Rane | नारायण राणेंचा खोचक टोला; म्हणाले – ‘मिलिंद नार्वेकर म्हणजे नवे शिवसेनाप्रमुख का?’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Narayan Rane | केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज (सोमवारी) महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुण्यातील सिंबायोसिस संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले. यावेळी फडणवीस आणि नारायण राणे या दोघांनीही उपस्थितांना संबोधित करत संविधानाचं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचं महत्त्व अधोरेखित केले. यानंतर फडणवीसांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे विश्वासू असणारे आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्या ट्वीटबद्दल सवाल करण्यात आला.

 

 

या दरम्यान, नारायण राणे यांनी शिवसेनेला (Shiv Sena) टोला लगावला आहे. मिलिंद नार्वेकरांच्या एका ट्विटविषयी प्रश्न विचारण्यात आला. आजचा दिवस बाबरी मशीद बलिदान दिवस असल्याच्या आशयाचं एक ट्वीट त्यांनी आज केलं आहे. यावरुन राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

दरम्यान, या ट्विटबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, नार्वेकरांचं बरोबरच आहे. त्यात चुकीचं काय? त्याचवेळी नारायण राणे म्हणाले की, नार्वेकर म्हणजे नवे शिवसेनाप्रमुख ना? एवढंच बोलून राणे पुढे निघून गेले. तसेच आपण सगळ्यात शेवटी बोलणार असल्याचा इशारा देखील नारायण राणे यांनी दिला आहे.

 

Web Title :- Narayan Rane | Bjp leader narayan rane milind narvekar shivsena general secretary babari masjid tweet

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा