Narayan Rane | राणे पत्रकारांवरच भडकले, कोण आहे जरांगे पाटील? मी ओळखत नाही, कशाला सतत नाव घेता…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या एका वक्तव्याबद्दल भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना पत्रकारांनी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता राणे भडकले आणि म्हणाले, कोण आहे जरांगे पाटील? मला माहीत नाही, मी ओळखत नाही. कशाला तुम्ही सतत नाव घेता? त्यांना विचारून या की घटनेच्या कोणत्या कलमानुसार मराठा आरक्षण (Maratha Reservation) दिले जावे. राणे (Narayan Rane) पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

नारायण राणे म्हणाले, मनोज जरांगे अजून लहान आहेत. त्यांनी आणखी अभ्यास करावा. आरक्षण कसे मिळते, भारतीय राज्यघटनेत आरक्षणाबाबत काय तरतुदी आहेत, हे जरांगे पाटलांनी जाणून घ्यावे. ओबीसीतून आरक्षण (OBC Reservation) हवे की नको, हे त्यांनी मराठा समाजाला विचारावे. कोणताही मराठा ओबीसीतून आरक्षण घेणार नाही.

यानंतर पुन्हा पत्रकारांनी मनोज जरांगे यांच्या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता राणे (Narayan Rane) भडकले.

मराठा आरक्षणाला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar Group) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) देखील जोरदार विरोध करत आहेत. याविषयी विचारले असता राणे यांनी भुजबळांवर निशाणा साधत म्हंटले की, कोणत्याही नेत्याने दोन समाजात झुंज लावण्याचा प्रयत्न करू नये.

वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी,
राज्यात काही दिवसांनी दंगल घडू शकते, अशी भीती नुकतीच वर्तवली होती. यावर प्रतिक्रिया देताना राणे म्हणाले,
प्रकाश आंबेडकर असे बोलले असतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना अटक केली पाहिजे.
कारण अशी माहिती लपवणे हा देखील गुन्हा आहे. त्यांना अटक करून तपास केला पाहिजे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrashekhar Bawankule | चंद्रशेखर बावनकुळेंची विरोधकांवर टीका, देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे जनक

Praful Patel | शरद पवार-अजित पवार एकत्र येणार? प्रफुल्ल पटेल स्पष्टच म्हणाले – ”घड्याळ तेच वेळ नवी…”

Pune Pimpri Crime News | बँक खाते हॅक करून महिलेला लाखोंचा गंडा, वाकड परिसरातील घटना