Naryan Rane | नवाब मलिक देशद्रोही व्यक्ती, नारायण राणे यांची घणाघाती टीका

रायगड : पोलीसनामा ऑनलाइन – मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) राष्ट्रवादीचे (NCP) प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने (ED) अटक (Arrest) केली आहे. मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) मंत्र्यांनी निदर्शने केली. मात्र एक देशद्रोही मंत्र्यासाठी (Traitor Minister) सत्ताधारी पक्षाचे लोक आंदोलन (Agitation) करतात हे दुर्दैवी आहे. अशांना या गादीवर बसण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री (Union Minister) आणि भाजप (BJP) नेते नारायण राणे (Naryan Rane) यांनी केली आहे. नारायण राणे (Naryan Rane) भराडी देवीच्या दर्शनाला सहकुटुंब आले होते.

 

नारायण राणे (Naryan Rane) यांनी भराडी देवीचे (Bharadi Devi) सहकुटुंब दर्शन घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आई जवळ काय साकडे घातले असे विचारले असता राणे म्हणाले, काही जण राणे कुटुंबीयांबाबत (Rane Family) राजकारणात सूडबुद्धीने, आकसाने, द्वेषाने वागत आहेत त्यांना दिर्घ आयुष्य दें, तसेच या सर्वांच्या विरोधात लढण्यासाठी आम्हाला बळ दे, असे साकडे घातल्याचे राणे यांनी सांगितले.

 

नारायण राणे पुढे म्हणाले, एका देशद्रोही मंत्र्यासाठी सत्ताधारी पक्षाचे लोक आंदोलन करतात हे दुर्दैवी आहे. खरंतर या सरकारने राजीनामा (Resignation) दिला पाहिजे. कारण एक देशद्रोही व्यक्तीला मंत्री म्हणून कॅबिनेटमध्ये (Cabinet) घेतलं आहे आणि आज त्याच समर्थन करत आहेत. अशांना या गादीवर बसण्याचा नैतिक अधिकार नसल्याचा टोला त्यांनी शिवसेनेला (Shivsena) लगावला.

कडवट हिंदुत्ववादी बाळासाहेब ठाकरेंचा (Balasaheb Thackeray) पक्ष आज सत्तेसाठी लाचारी करीत आहे.
पदासाठी देशद्रोही लोकांचं समर्थन करत आहेत. या पेक्षा वाईट गोष्ट नाही. उपोषणाला बसले आहेत.
उपोषणाला बसलेल्यांना देशद्रोह कायद्याखाली अटक केली पाहिजे असेही राणे यांनी यावेळी सांगितले.

 

2024 मध्ये आमची सत्ता आली की तुम्हाला बघून घेऊ असे म्हणणारे हे तेच आहेत.
पदासाठी लाचारी पत्कारुन हिंदुत्वाचा त्याग करुन सत्तेत गेले. आणि आता दिल्लीची सत्ता घेणार असे म्हणत आहेत.
भाजपचे 301 खासदार (BJP MP) आहेत. मोदींच्या (PM Narendra Modi) आशीर्वादाने शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले.
पुढच्या वेळी 5 पण येणार नाहीत आणि केंद्राची स्वप्न पाहत आहेत. केंद्राची स्वप्न पाहण्यापेक्षा राज्यातील घडामोडी बघा असा टोला राणे यांनी लगावला.

 

Web Title :- Narayan Rane | bjp leader naryan rane on nawab malik arrest case on shivsena

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nawab Malik | नवाब मलिकांना दिलासा ! ‘त्या’ दोन मागण्या कोर्टाकडून मान्य

 

Supriya Sule | ‘…म्हणून मी गृहमंत्री अमित शहांकडे न्याय मागणार आहे’ – सुप्रिया सुळे

 

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 60 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी