Narayan Rane | ‘संजय राऊत यांना हिंदुत्व कळले नाही म्हणून शिकवायची वेळ आली’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – हिंदुत्वाच्या मुद्यावरुन शनिवारी समानातील अग्रलेखातून भाजपवर टीका करण्यात आली. यानंतर भाजपचे (BJP) नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधाला आहे. संजय राऊत यांना हिंदुत्व (hindutva) कळले नाही म्हणून शिकवायची वेळ आली, अशा शब्दांत नारायण राणे (Narayan Rane) यांनी संजय राऊतांना टोला लागवला आहे.

 

नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले, संजय राऊत यांना हिंदुत्व कळले नाही म्हणून शिकवायची वेळ आली आहे. काही लोकांनी आपल्या पदाचा गैरवापर केला असून अमित शहा (Amit Shah) किमान काश्मीरला (Kashmir) तरी जातात, संजय राऊत यांनी जाऊन तरी दाखवावे. त्यांचे राज्यात सरकार असून हे काय करत आहेत. तसेच आताचे राज्याचे उद्योगमंत्री जमिनी विकत आहेत, असा सणसणीत टोला राणे यांनी राऊतांना लगावला.

 

मुख्यमंत्र्यांवर आरोप करताना राणे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी भारतीय घटना वाचावी. मुख्यमंत्री यांनी कर्तव्य काय हे त्यांनी आधी समजून घ्यावी, जबाबदार व्यक्तीने असे बेलू नये. कायद्यात नसताना त्या गोष्टी ठाकरे सरकार (Thackeray government) बोलत आहे. अडीच वर्षे झाली तरी यांना एबीसीडी कळलेली नाही, असा आरोप राणेंनी केला.

 

सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टीका

काश्मीरातील हिंदूंच्या किंकाळ्यांनी ज्यांचे मन द्रवत नाही त्यांनी माहाराष्ट्रावर प्रवचने झोडू नयेत असा टोला शिवसेनेने लगावला आहे.
तसेच काश्मीरातील व बांगलादेशातील होरपळणाऱ्या हिंदूंचे रक्षण करणे हे मोदी सरकारचेच (Modi government) कर्तव्य आहे, असेही शिवसेनेने म्हटलं.
यावेळी शिवसेनेनं हिंदूच्या संरक्षणासाठी सीमेवर धडकणाऱ्या शत्रूला चोख उत्तर दिलं पाहिजे असे काश्मीर आणि बांगलादेशचं उदाहरण देत म्हटलं आहे.
तसेच लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा सुरक्षित आहे काय? असा प्रश्नही शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

 

Web Title :- Narayan Rane | bjp minister and leader narayan rane criticized sanjay raut on hindutva

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrakant Patil | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आधी माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी मारली ‘बाजी’, जाणून घ्या

Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले ब्रिजवर ‘अब तक 56’ ! ‘या’ कारणामुळं ‘सेल्फी पॉईंट’जवळ अपघात होत असल्याचं वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी स्पष्टचं सांगितलं (व्हिडीओ)

Pimpri Corona | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 98 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी