Narayan Rane | नारायण राणेंचे अनधिकृत बांधकाम वाचवण्यासाठी ‘हे’ IAS अधिकारी प्रयत्न करत असल्याच्या नव्या आरोपाने प्रचंड खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या जुहूतील बंगल्यातील (Juhu Bungalow) अनधिकृत बांधकाम (Unauthorized Construction) मुंबई महापालिकाच वाचवत आहे. आयुक्त इक्बाल सिंह चहल (BMC Commissioner Iqbal Singh Chahal) यांच्याकडून तसे प्रयत्न सुरु असल्याचे आरोप संतोष दौंडकर (Santosh Daundkar) यांनी केला आहे. संतोष दौंडकर हे माहिती अधिकारांतर्गत (RTI) या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत. नारायण राणे (Narayan Rane) यांच्या अधीश बंगल्यावर (Adhish Bungalow) पालिकेकडून कारवाई करण्यात दिरंगाई होत असल्याचे दौंडकर यांनी म्हटले आहे. (IAS Iqbal Singh Chahal)
पालिकेने अधिश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी आधी 15 दिवसांची नोटीस दिली असताना पुन्हा 15 दिवसांची नोटीस देण्याची आवश्यकताच नव्हती, असे संतोष दौंडकर यांनी म्हटले आहे. या प्रकरणी आता दौंडकर यांच्याकडून पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना कायदेशीर नोटीस (Legal Notice) पाठवली जाईल.
नारायण राणेंची उच्च न्यायालयात धाव
दुसरीकडे नारायण राणे यांनी आधिश बंगल्यावरील पालिकेची कारवाई टाळण्यासाठी आता मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) धाव घेतली आहे. अधिश बंगल्यातील कथित बेकायदा बांधकामांविषयी पालिकेने बजावलेल्या नोटीसा चुकीच्या व बेकायदा आहेत. हे आदेश रद्दबातल ठरवण्यात यावेत, अशी मागणी नारायण राणे यांनी याचिकेत (Petition) केली आहे. राणे कुटुंबियांचे (Rane Family) समभाग असलेली कंपनी आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रा. लि. (Artline Properties Pvt. Ltd.) मालकीचा बंगला आहे. त्या कंपनीमार्फत ही याचिका करण्यात आली आहे. या याचिकेवर मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी (Hearing) होण्याची शक्यता आहे.
BMC ची कारणे दाखवा नोटीस
मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) 5 मार्च रोजी अधिश बंगल्याच्या बांधकामाबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
बंगल्यात अनधिकृत बांधकाम करण्यात आले असल्याचे महापालिकेचे निरीक्षण आहे.
यासंदर्भात पालिकेने राणे यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी नोटीस बजावली होती.
9 अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या महापालिकेच्या पथकाने 21 फेब्रुवारी रोजी नारायण राणे यांच्या जुहूमधील अधीश या बंगल्याची पाहणी केली होती.
त्यावेळी या पथकाने राणे यांच्या बंगल्याची दोन तास पाहणी केली होती.
या पाहणीमध्ये राणे यांनी आपल्या अधिश बंगल्याच्या बांधकामादरम्यान FSI चे उल्लंघन केल्याचे आढळून आल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.
Web Title :- Narayan Rane | bmc commissioner IAS iqbal singh chahal trying to save illegal work in narayan rane juhu adhish bungalow
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update