Narayan Rane | केंद्रीय मंत्री नारायण राणेंना हायकोर्टाचा धक्का, तातडीनं सुनावणी घेण्यास न्यायालयाचा नकार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Narayan Rane | वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना मुंबई उच्च न्यायालयानेही (bombay High Court) धक्का दिला आहे. नारायण राणे यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी (hearing) घेण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. याचिकेची स्कॅन्ड कॉपी (Scanned copy) दाखल करुन घेण्यास हायकोर्टाच्या रजिस्ट्रीनं नकार दिला आहे. याशिवाय याचिकेची नोंद होऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय तातडीनं सुनावणी करण्यास न्यायमूर्ती संभाजी शिंदे (Justice Sambhaji Shinde) व न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार (Justice Nizamuddin Jamadar) यांच्या खंडपीठाने नकार दिला आहे.

याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती राणे यांच्या वतीने अ‍ॅड. अनिकेत निकम (Adv. Aniket Nikam) यांनी कोर्टाला केली. परंतु तातडीच्या सुनावणीसाठी रीतसर अर्ज सादर करण्याची कायदेशीर प्रक्रिया आधी करा, असे सांगून कोर्टाने तात्काळ सुनावणी देण्यास नकार दिला. त्यामुळे आता राणेंच्या वकिलांची हायकोर्टात धावपळ सुरु असून सायंकाळी साडेचार वाजता लेखी अर्जासह पुन्हा तात्काळ सुनावणीसाठी हायकोर्टाला विनंती केली जाण्याची शक्यता.

दरम्यान, संगमेश्वर पोलिसांनी (Sangameshwar police) नारायण राणे यांना पोलीस ठाण्यातून महाडच्या दिशेने घेऊन जात आहेत. त्यांना महाडच्या सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. न्यायालयात काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महाड आणि संगमेश्वर या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हे देखील वाचा

Karad Crime | वारुंजी येथे 2 वर्षांच्या बालकासह महिलेचा आढळला मृतदेह; परिसरात खळबळ

Sharad Pawar | नारायण राणे प्रकरणावर शरद पवारांनी दिली मोजक्या शब्दात प्रतिक्रिया; म्हणाले…

Salary Slip | नोकरीमध्ये सॅलरी स्लिपचे काय आहे महत्व, जाणून घ्या कामाच्या 10 महत्वाच्या गोष्टी

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : narayan rane | bombay high court refuses to hear narayan ranes plea on immediate basis

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update