‘एक शरद अन् शिवसेना गारद’ : नारायण राणे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची एक विशेष मुलाखत लवकरच पहायला मिळणार आहे. ही मुलाखत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. या मुलाखतीचा प्रोमो सोशल मीडियावर व्हारयरल होत आहे. संजय राऊत यांनी मुलाखतीच्या प्रमोला ‘एक शरद, सगळे गारद’ अशी टॅगलाईन दिली आहे. यावरून सध्या राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.

भाजपचे खासदार नारायण राणे यांनी यावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शुक्रवारी नारायण राणे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. यावेळी त्यांना राजकारणात शरद पवार यांच्या समोर कोण गारद ? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी एक शरद आणि शिवसेना गारद असा शब्दिक टोला शिवसेनेला लगावला आहे. याशिवाय, मुलाखतीसाठी शिवसेनेकडे माणसंच नाहीत. त्यामुळे शरद पवारांना घेतले असल्याचे राणे यांनी सांगितले.

तसेच पहिली ज्यांची मुलाखत यायची ती माहीती गोळा केलेली असायची. यामध्ये स्वत:चे विचार, माहिती असे काय आहे ? असा प्रश्न त्यांनी शिवसेनेला केला आहे. त्याचबरोबर मुलाखतीत शरद पवार जे बोलतील ते राज्याच्या हिताचे असेल, असेही नारायण राणे यांनी म्हटले आहे.

….तर तीव्र आंदोलन करू

कोकणात मुंबईकरांमुळे कोरोना व्हायरस वाढला, असे नारायण राणे म्हणाले. तसेच, गणेशोत्सवासाठी कोकणात जायला कोकणी माणसाला बंदीचा आदेश निघालेला नाही. जर बंदीचा आदेश आला तर तीव्र आंदोलन करु, असा इशारा यावेळी नारायण राणे यांनी दिला आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या मुलाखतीचा प्रोमो संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. ज्यामध्ये या मुलाखतीमधील काही प्रश्न पवारांची उत्तरं पहायला मिळणार आहेत. ही मुलाखत 11,12 आणि 13 जुलैला पाहता येणार आहे.

विशेष म्हणजे ही राजकीय मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. याबाबत संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट देखील केले आहे. या मुलाखतीत शरद पवार चीन पासून महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीवर जोरदार बोलले असल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता या मुलाखतीत शरद पवार हे नेमके काय बोलले आणि कोणता गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like