‘मी पुन्हा येईन, ही घमेंड नाही तर…’, शरद पवारांच्या मुलाखतीवर नारायण राणेंचा ‘घणाघात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी भाजपवर टीका केली. तसेच देवेंद्र फडणवीस यांचा नामोल्लेख न करता टीका केली होती. विशेषत: देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा या विधानावर पवार यांनी या मुलाखतीत भाष्य केलं होतं. शरद पवार यांची ही मुलाखत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामानातून तीन भागात प्रसिद्ध झाली होती. यावर भाजपचे नेते खासदार नारायण राणे यांनी टीका केली आहे. नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना राणे म्हणाले, सर्वांना माहिती आहे की, कोरोनामुळे देशात व जगात हाहा:कार झाला आहे. महाराष्ट्रात भयावह परिस्थिती आहे. कोरोनावर मात करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात. याविषयी मुलाखतीत मार्गदर्शन केलं असतं तर मुलाखत यशस्वी झाली असं मी समजून घेतलं असतं, असा टोला त्यांनी लगावला.

शरद पवारांवर जितकी टीका सामनातून झाली, तितकी कोणत्याही वर्तमानपत्रातून झाली नाही. शरद पवारांविषयी मला आदर आहे, पण सामानातील ही मुलाखत हेच राजकारण आहे, असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. नारायण राणे पुढे म्हणाले की, या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली. सत्तेचा दर्प चालत नाही, लोक पराभूत करतात, हे कोणाला उद्देशून होतं. नाव का नाही घेत. पण हे देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून आहे. फडणवीस हे घमेंड करणारे, गर्व करणारे व्यक्ती नाहीत. सत्तेवर असताना त्यांनी मुख्यमंत्री पदाची मस्ती आली, असं एकही उदाहरण कुणी सांगू शकत नाही. त्यामुळे त्यांनी त्यावेळी प्रचारात म्हटलं असेल, मी पुन्हा येईन. यात घमेंड गर्व नाही, हे आपल्या कार्यकर्त्यांना आत्मविश्वास देण्यासाठीचे वाक्य असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले.

मी पाच वर्षे यशस्वी काम केलं. त्यामुळे लोक मला निवडून देणार, तो विश्वास त्यांनी बोलून व्यक्त केला. मग शरद पवार यांना असं का दिसावं, त्यामुळे ही डेडिंग बरोबर नाही. 105 आमदरांमध्ये शिवसेनेचं योगदान काय. 2014 मध्ये शिवसेनेचे खासदार आमदार निवडून आले. हे तिघे एकत्र आले, याचं आश्चर्य आहे. काही नेत्यांच्या तोंडून मी ऐकलं होतं की, शिवसेना जातीयवादी पक्ष आहे. मग आता एकत्र कशामुळे, हे जनतेला समजलं तर बरं झालं असतं असेही राणे यांनी म्हणत शिवसेनेवर निशाणा साधला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like