पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Narayan Rane In Pune | पुण्याला कै. केशवराव जेधे, कै. विठ्ठलराव गाडगीळ, कै. आण्णा जोशी अशी लोकसभेत खासदारांची विशेष परंपरा आहे. हीच परंपरा मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) दिल्लीत येऊन नक्की जोपासतील, वाढवतील, असा विश्वास केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला. (Pune Lok Sabha Election 2024)
भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस-रिपब्लीकन पक्ष (आठवले गट) व मित्र पक्षांच्या महायुतीचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी राणे यांच्या पुण्यातील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यावेळी शुभेच्छा देताना राणे बोलत होते. (Narayan Rane In Pune)
या औपचारिक भेटीच्या वेळी बोलण्याची सुरूवातच राणे यांनी मोहोळ हे निवडून येणार आहेतच, अशी केली. ते म्हणाले, ‘मोहोळ हे १०० टक्के विजयी होणार आहेत. मोहोळ यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माझ्यापर्यंत सकारात्मक प्रतिक्रिया आल्या आहेत. विजयानंतर ते दिल्लीला आमच्या सोबतच असतील’. यावेळी मोहोळ यांनी आतापर्यंत आपण मतदारांपर्यंत पोचण्यासाठी काय केले याची महिती दिली. त्यानंतर राणे यांनीही काही मौलिक सूचना यावेळी केल्या.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
शिरुर लोकसभा मतदारसंघात विद्यार्थ्यांची प्रभात फेरीद्वारे मतदान जनजागृती
Baramati Lok Sabha Election 2024 | बारामती लोकसभा मतदार संघात मतदार जागृती उपक्रमांचे आयोजन
वंचित पुण्यातून उमेदवार देणार, वसंत मोरेंना उमेदवारी देण्यास स्थानिक नेत्यांचा विरोध
पिंपरी : उद्योगपती मालपाणी कुटुंबाचा सदस्य असल्याचे भासवून महिलेची 93 लाखांची फसवणूक, आरोपी गजाआड
विश्रांतवाडी, वानवडी, हडपसर परिसरात घरफोडी, सोन्याच्या दागिन्यासह दोन कारची चोरी
Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटात
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या इतिहासाला उजाळा; अभिनेते रणदीप हुडा यांनी पाळला
पुनीत बालन यांना दिलेला शब्द (Video)