Narayan Rane | ‘…नाहीतर लोक बाजूच्या मंत्रालयात जातील आणि ते तर सध्या बंद आहे’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Narayan Rane | येथील भाजपच्या (BJP) प्रदेश कार्यालयात शनिवारी केंद्रीय लघू, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे (Narayan Rane ) यांचा राज्यातील पदाधिकारी संवाद कार्यक्रम पार पडला.त्यावेळी राणेंच्या खात्याशी संबंधित अधिकारी माहितीचे सादरीकरण करत होते, त्यावेळी ते केवळ मंत्रालय असा उल्लेख करत होते. त्यावरून नारायण राणेंनी थेट सादरीकरण थांबवत नुसते मंत्रालय, मंत्रालय म्हणू नका. नाहीतर लोक बाजूच्या मंत्रालयात जातील आणि ते तर सध्या बंद आहे, तेथे काही घडतच नाही, असा टोला लगावला.
भाजपने सर्वत्र मंत्री- कार्यकर्ता संवादअंतर्गत केंद्रीय मंत्र्यांशी संवादाचे कार्यक्रम सुरू केले असून त्याअंतर्गत शनिवारी प्रदेश कार्यालयात हा कार्यक्रम झाला. त्यावेळी राणेंच्या (Narayan Rane ) खात्याशी संबंधित अधिकाऱ्यांनी खात्यात कोणकोणत्या योजना आणि कशा पद्धतीने रोजगार उपलब्ध होतील, याची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. उपस्थितांना ही माहिती सादरीकरणाद्वारे सांगत असताना अधिकारी वारंवार लघू, सूक्ष्म आणि मध्यम मंत्रालय असा उल्लेख न करता फक्त मंत्रालय, मंत्रालय असा उल्लेख करीत होते. राणेंनी तत्काळ त्यांना तत्काळ थांबवले आणि म्हणाले की, कोणते मंत्रालय ते उपस्थितांना नीट समजावून सांगा; नाही तर हे उद्यापासून बाजूच्या मंत्रालयात जातील, ज्याचे दुकान सध्या बंद आहे. दरम्यान, सादरीकरण हिंदीत सुरु केल्याने राणेंनी अधिकाऱ्यांना रोखत आपण उत्तम मराठी बोलू शकता. त्यामुळे मराठीतूनच बोला असे बजावले. यावेळी उद्योजकांच्या अडचणी समजून घेत त्या सोडविण्याचे आश्वासन राणेंनी यावेळी दिले.
Pune Petrol Price | ‘पेट्रोल-डिझेल’च्या दराचा दररोज नवीन ‘उच्चांक’; जाणून घ्या नवे दर
Chandrakant Patil | भाजपला हरवणे सोपे नाही, BJP चा राष्ट्रवादीला इशारा