Narayan Rane | केंद्रीय मंत्री नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका, पुरुषार्थ हे पुस्तक मला नाही, उद्धव ठाकरेंना द्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Narayan Rane | मला सत्कारच्या वेळी ’पुरुषार्थ’ हे पुस्तक दिले. हे पुस्तक मला नाही उद्धव ठाकरेंना दिले पाहिजे, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांच्यावर केली. उगवत नाही, फुलत नाही, वास येत नाही असा चाफा मातोश्रीतच आहे, असेही यावेळी राणे म्हणाले.

 

नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले, आशिष शेलार (Ashish Shelar) कवी पण आहेत. कविता बोलता-बोलता ते चाफा फुलेना, उगवेना पण म्हणाले. उगवत नाही, फुलत नाही, वास येत नाही असा चाफा मातोश्रीतच आहे, बाकी कुठे नाही. खरं त्या माणसामध्ये…अडीच वर्ष मिळाली हो.. महाराष्ट्र कसा सहन करत होता मला कळत नाही. काही येत नाही त्याला. मी 39 वर्ष जवळून पाहिले त्या माणसाला, अगदी लहान असल्यापासून पाहिले. काही येत नाही.

 

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना राणे पुढे म्हणाले, आता रोज फक्त एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली जात आहे. मी सांगेन की उत्तर देऊ नका, आपला वेळ वाया घालवू नका, कामे करा. बाळासाहेब (Balasaheb Thackeray) हे साहेब होते. साहेबांच्या नखाची सर देखील यांना नाही. कशाची सर देऊ यांना, कोळसाही म्हणू शकत नाही.

मोदींचे कौतुक करताना राणे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे व्यक्तिमत्त्व जागतिक कीर्तीचे आहे.
जगात त्यांचे कौतुक केले जाते. कॅबिनेट बैठकांना जेव्हा मी बसतो तेव्हा सर्व गोष्टी त्यांना माहिती असतात.
ते जेव्हा बोलतात, तेव्हा त्यांना बघतच बसावे असे वाटते. त्यांना सर्व वर्गाची काळजी आहे.

 

Web Title :- Narayan Rane | maharashtra political crisis union minister narayan rane criticises shivsena chief uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | चिठ्ठी आयी है, आयी है…भाषण सुरू असतानाच अजितदादा गुणगुणले गाणं, कार्यकर्त्यांमध्ये हास्यकल्लोळ!

Pune Crime | अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई, 5 लाखाचा भेसळयुक्त गुळ व साखर जप्त

Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी पुन्हा राज्याव्यापी आंदोलन करू, मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक, सरकारला इशारा