Narayan Rane | ‘दिशा सालियनवर अत्याचार केला, हत्या केली, सोडणार नाही’ म्हणत नारायण राणेंचा गंभीर इशारा

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – दिशा सालियान प्रकरणावरुन (Disha Salian Case) सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यात अनेक राजकीय नेते आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. भाजप (BJP) नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज पुन्हा एकदा शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Shiv Sena MLA Aaditya Thackeray) यांचे नाव घेत गंभीर इशारा दिला. नारायण राणे (Narayan Rane) सिंधुदुर्गमध्ये बोलत होते.

 

नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले, सुशांतसिंह (Sushant Singh Rajput) आणि दिशा सालियानचं नाव आलं की आदित्य ठाकरे चवताळले. दिशी सालियन या एका भारतीय महाराष्ट्रीय मुलीवर अत्याचार केला आहे, हत्या केली आहे. त्यावेळी आदित्य ठाकरे तिथे उपस्थित होते, सोडणार नाही. सत्ता भाजप आणि शिंदे गटाची (Shinde Group) आहे हे लक्षात ठेवा, असंही नारायण राणे यांनी म्हटले. यापूर्वी देखील नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंवर या प्रकरणावरुन गंभीर आरोप केले होते.

 

दिशा सालियान प्रकरणी होणाऱ्या आरोपांविरोधात आदित्य ठाकरे कोर्टात जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
बदनामी करणाऱ्यांविरोधात आदित्य ठाकरे अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची शक्यता आहे.
आदित्य ठाकरे यां संदर्भात कायदेशीर सल्ला घेत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
मागील काही दिवसांपासून आदित्य ठाकरे हे दिशा सालियान प्रकरणावरुन विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत.
भाजप नेत्यांकडून त्यांना टार्गेट केले जात आहे.

 

Web Title :- Narayan Rane | narayan rane allegation on aaditya thackeray sushant singh disha salian case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Khushi Kapoor | सध्या सोशल मीडियावर खुशी कपूरच्या फोटोने घातलाय धुमाकूळ; सोशल मीडियाचा पारा वाढला

Solapur Police | कर्तव्य सोडून पोलिसाचा भरचौकात डान्स, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस कर्मचारी ताब्यात

Tunisha Sharma Death | तुनिषा शर्माच्या पोस्टमॉर्टममध्ये मोठा खुलासा; मृत्यूचे कारण आले समोर

MP Sanjay Raut | ‘… त्या दिवशी संजय राऊत हे शरद पवारांच्या मांडीवर बसलेले दिसतील’, शिंदे गटाच्या आमदाराचा टोला

Gulabrao Patil | मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपावरुन गुलाबराव पाटील एकनाथ खडसेंवर संतापले, म्हणाले -‘आधी जावयाला जेल बाहेर काढा आणि मग…’