Narayan Rane | पुन्हा एकदा नारायण राणे VS शिवसेना वाद पेटणार ! मालवण चिवला बीचवरील निलरत्न बंगल्यावर कारवाईचे आदेश?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप नेते (BJP Leader) आणि केंद्रीय मंत्री (Union Minister) नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेना (Shivsena) यांच्यातील वाद पुन्हा तापला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी शिवसेना भवनात (Shiv Sena Bhavan) घेतलेल्या पत्राकर परिषदेला नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले. यानंतर पुन्हा एकदा राणे आणि शिवसेना यांच्यात वाद पेटण्यास सुरुवात झाली आहे. राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (Sindhudurg District) मालवण चिवला बीचवरील (Malvan Chivla Beach) नीलरत्न या बंगल्यावर (Neelratna Bungalow) कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

दरम्यान मुंबई महापालिकेनं (BMC) नारायण राणे (Narayan Rane) यांच्या जुहू येथील अधिश बंगल्याची (Adhish Bungalow Juhu) पाहणी करण्यासाठी नोटीस दिली. मुंबई महापालिकेचे अधिकारी राणे यांच्या घरी पोहचले. मात्र, जबाबदार व्यक्ती त्याठिकाणी उपस्थित नसल्याने ते पाहणी न करताच निघून गेले. यानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनवर प्रहार केला.

 

याला प्रत्युत्तर देण्यासाठी पुन्हा शिवसेनेनं मुंबईतील अविघ्न इमारती संदर्भात प्रश्न उपस्थित केले होते. शिवसेनेने घेतलेल्या पत्रकार परिषदेत राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण चिवला बीचवर नीलरत्न बंगल्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले. याच बंगल्यावर आता कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारत सरकारच्या (Government of India) मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज नागपूर (Ministry of Environment Forest and Climate Change Nagpur) कार्यालयानं महाराष्ट्र कोस्टल प्राधिकरणाला (Maharashtra Coastal Authority) हे आदेश दिल्याचे समजते.

राणे-शिवसेना वाद पेटणार
नारायण राणेंच्या अधिश बंगल्याच्या पाहणीचा वाद ताजा असताना नीलरत्न बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.
काल नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन मातोश्री दोन अनधिकृत (Matoshri Two Unauthorized) असल्याचे म्हटलं होतं.
त्यानंतर ऑगस्ट 2021 ला दिलेल्या आदेशावर अंमलबजावणी करण्यासाठी पत्र काल पाठवण्यात आलं आहे.
त्यामुळे नारायण राणे विरुद्ध शिवसेना असा वाद आणखी पेटणार असल्याचे पहायला मिळत आहे.
निलरत्न बंगल्यावर कारवाईचे आदेश दिल्याने राणे याबद्दल काय भूमिका घेणार हे पहावं लागणार आहे.

 

Web Title :- Narayan Rane | narayan rane chivala beach nilratna bungalow will be demolish coastal authority order

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांना मोठा झटका ! 18 महिन्यांच्या DA थकबाकीबाबत मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

 

SPPU On Online Exam Copy | कॉपी बहाद्दरांना ‘फौजदारी’चा दणका ! परीक्षेत कॉपी करताना आढळून आल्यास खावी लागणार थेट जेलची हवा

 

Pune Crime | धक्कादायक ! अनैतिक संबंधाला पोटचा 13 वर्षाचा मुलगा ठरत होता अडथळा, परकरच्या नाडीने आईने आवळला गळा