Narayan Rane | उद्धव ठाकरे मातोश्रीचे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे नाही, नारायण राणेंचे टीकास्त्र (व्हडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) गुरुवारी पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट (Late BJP MP Girish Bapat) यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बापट यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला. ठाकरेंचे काय राहिलंय आता? ठाकरे संपले आता. ठाकरेंचे काही राहीलं नसून मातोश्री (Matoshree) राहिले आहे. यापूर्वी ते अडीच वर्ष मुख्यमंत्री होते. त्यावेळी उद्धव ठाकरे मातोश्रीचे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे नाही, अशी टीका नारायण राणे (Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
नारायण राणे (Narayan Rane) पुढे म्हणाले, पुण्यात अनेक प्रश्न आहेत तरी ठाकरे गटाबद्दल (Thackeray Group) मला का प्रश्न विचारले जात आहेत. ठाकरे गट, मातोश्री एवढाच महाराष्ट्र आणि भारत आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांना छत्रपती संभाजीनगर मधील घटनेबाबत (Chhatrapati Sambhaji Nagar Incident) विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी आपण या प्रकरणी काही बोलणार नाही. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे प्रकरण सांभाळतील, असंही राणे यांनी सांगितलं.
दरम्यान, नारायण राणे यांनी गिरीश बापट यांच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले,
बापट 1995 साली आमदार म्हणून सभागृहात आले तेव्हा मी स्वत: आमदार होतो.
मी शिवसेनेत (Shivsena) होते आणि भाजप सोबत आमची युती होती.
विधीमंडळाच्या कामकाजात ते रस घेत होते. गिरीश भाऊ गेल्यामुळे आता पोकळी निर्माण झाली आहे.
यामुळं भाजपचं खूप मोठं नुकसान झालं आहे. यातून पक्ष बाहेर येईल मात्र
त्यांच्या कुटुंबीयांना यातून बाहेर पडण्यासाठी देव त्यांना ताकद देवो, असे राणे म्हणाले.
Web Title :- Narayan Rane | narayan rane criticism uddhav thackeray matoshree chief minister maharashtra
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime News | जुन्या कात्रज घाट रोडवरील हॉटेल तोरणाजवळ युवकाच्या खुनाचा प्रयत्न