Narayan Rane | ‘त्या’ प्रकरणात नारायण राणे, नितेश राणेंची 9 तास चौकशी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिशा सालियनबाबत (Disha Salian) एका पत्रकार परिषदेत बदनामीकारक वक्तव्य (Defamatory Statement) केल्याप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यात (FIR) भाजप (BJP) नेते नारायण राणे (Narayan Rane), आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांची शनिवारी तब्बल 9 तास चौकशी (Inquiry) करण्यात आली. परिमंडळ 11 चे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर (DCP Vishal Thakur) तसेच क्राइमचे पोलीस निरीक्षक महेंद्र सूर्यवंशी (Police Inspector Mahendra Suryavanshi) यांच्या उपस्थितीत हा जबाब नोंदवण्यात आला. दरम्यान, दिशा सालियन आत्महत्या प्रकरणात (Salian Suicide Case) बोलू नये यासाठी मुख्यमंत्र्यांचा (CM) दोन वेळा फोन आला होता पण आम्ही बोलणार असे नारायण राणे (Narayan Rane) यांनी स्पष्ट केले आहे.

 

दिशाबाबत बदनामीकारक वक्तव्ये केल्याप्रकरणी दिशाच्या पालकांनी नारायण राणे (Narayan Rane) आणि नितेश राणे यांच्याविरोधात मालवणी पोलीस ठाण्यात (Malvani police station) फिर्याद दिली आहे. दरम्यान राणे पिता पुत्रांनी अटकपूर्व जामिनासाठी (Pre-Arrest Bail) सत्र न्यायालयात (Sessions Court) धाव घेतली होती. त्यानंतर शनिवारी दोघांचेही जबाब नोंदवण्यात आले. शनिवारी दुपारी 12.40 वाजता राणे पिता पुत्र मालवणी पोलीस ठाण्यात दाखल झाले. यावेळी समर्थकांची पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी झाली होती. राणे पितापुत्रासोबत त्यांचे वकील ॲड. सतीश मानेशिंदे (Add. Satish Maneshinde) तसेच अंगरक्षक (Bodyguard) आणि कमांडो देखील (Commandos) होते.

 

पोलिसांनी दोघांनाही तिसऱ्या मजल्यावर घेऊन गेले. त्या ठिकाणी परिमंडळ 11 चे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर तसेच क्राइमचे पोलीस निरीक्षक महेंद्र सूर्यवंशी उपस्थित होते. तर दुसरीकडे पोलीस ठाण्याबाहेर समर्थकांनी गर्दी केल्याने वाहतूक कोंडी झाली होती.

राणे यांच्या कडे तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली. दोघांनाही रात्री 10 नंतर सोडण्यात आले. जबाब नोंदवण्यासाठी इतका वेळ घेतल्याने समर्थकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले होते. पोलीस त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होते. तर राणे यांचे वकील माने शिंदे यांनी पोलीस विनाकारण त्रास देत असल्याचा आरोप केला आहे.

 

यासंदर्भात बोलताना नारायण राणे म्हणाले की,
दिशा सालियनच्या कुटुंबियांना तक्रार देण्यास महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी भाग पाडले.
पोलिसांनी आमची चौकशी केली असून याबाबत सर्व माहिती अमित शहा (Amit Shah) यांना फोनवरून दिली आहे.
दिशाच्या आत्महत्या प्रकरणात बोलू नये यासाठी मुख्यमंत्र्यानी दोन वेळा फोन केला. पण आम्ही बोलत राहणार असे ठामपणे त्यांनी सांगितले.

 

Web Title :- Narayan Rane | narayan rane nitesh rane interrogated by police for 9 hours in disha salian case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 99 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

BCCI Announces Schedule For TATA IPL 2022 | आयपीएलचं बिगुल वाजलं ! मुंबई, चेन्नई वेगवेगळ्या गटात, पाहा कोणता संघ कोणत्या गटात; वाचा सविस्तर

 

PM Modi Visit To Pune | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील प्रमुख 10 मुद्दे