Narayan Rane | ‘पंचवीस पैशांच्या नाण्यावर नारायण राणेंचा फोटो लावला’ – फेसबूक बहाद्दर

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – Narayan Rane | मागील दोन दिवसांत देशातील चलनी नोटांवर कोणाचा फोटो असावा, याबाबात राजकीय नेत्यांकडून विविध विधाने केली जात आहेत. त्यात आता एका फेसबूक बहाद्दराने 25 पैशांच्या वापरात नसलेल्या नाण्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचा फोटो लावून तो संदेश टाकला आहे. त्यावर त्याने ‘अध्यक्ष महोद्य हे फायनल करा’ असे म्हंटले आहे. त्यामुळे नवा वाद सुरु झाला आहे. या विरोधात तक्रार देखील करण्यात आली आहे.

सर्वप्रथम दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनी एका पत्रकार परिषदेत भारतीय चलनी (Indian Currency) नोटांवर गणपती आणि लक्ष्मी या हिंदू देवतांच्या प्रतिमा लावण्याची मागणी केंद्र सरकारकडे (Central Government) केली होती. त्यावर त्यांच्यावर अनेकांनी टीका केली. काँग्रेसने (Congress) तर ते भाजप (BJP) आणि संघाचे काम करत असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) आणि नितेश राणे (Nitesh Rane) यांनी देखील विविध मागण्या केल्या. राम कदम यांनी नोटांवर सर्व महापुरुषांचे आणि विद्यमान नेत्यांच्या प्रतिमा लावण्याची मागणी केली. मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar), स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantra Veer Savarkar) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या प्रतिमा असलेल्या नकली नोटा त्यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरुन ट्वीट केल्या. नितेश राणे यांनी शिवाजी महाराजांच्या नोटेचा फोटो ट्वीट केला होता. त्यावर हे सर्व नेते समाज माध्यमे आणि इतर ठिकाणी टीकेचे धनी झाले आहेत.

दरम्यान, ‘चावडी’ नामक फेसबूक (Facebook) वापरकर्त्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane)
यांच्या प्रतिमेचा वापर करुन तयार केलेले 25 पैश्यांचे नाणे आता चर्चेचा विषय झाले आहे.
या प्रकारावर भाजप आक्रमक झाली आहे. भाजपच्या युवा मोर्चाने या पोस्टची कुडाळ पोलीस ठाण्यात
(Kudal Police Station) तक्रार दिली आहे.

Web Title :- Narayan Rane | narayan rane photo morph on 25 paise coin and demand to approve viral post

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Zero Interest Loan | मराठा तरुणांना व्यावसायासाठी बीनव्याजी मिळणार कर्ज