‘राणे यांची वैद्यकीय तपासणी करावी’ : शिवसेना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांनी दसरा मेळाव्यात अप्रत्यक्षपणे भाजपा खासदार नारायण राणे यांच्या कुटुंबावर टीका केली. राणे यांनीही पत्रकार परिषद घेऊन ठाकरे यांनी केलेल्या टीकेला सडेतोड उत्तर दिले होते. त्यानंतर आता शिवसेना आक्रमक झाली असून सेना नेत्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राणे यांचे पत्रकार परिषदेतील हावभाव आणि बोलणे पाहता त्यांची वैद्यकीय तपासणी (/narayan-rane-needs-medical-test) करणे गरेजेचे असल्याचे कृषीमंत्री दादा भुसे (shivsena-leader-dada-bhuse) यांनी म्हटले आहे.

राज्याच्या मुख्यमंत्र्याचा एकेरी उल्लेख नारायण राणेंनी करणे गैर आहे. एवढच नव्हे तर हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणार आहे. नारायण राणे यांचा इतिहास आणि भूगोल सगळ्यांनाच माहित आहे. नारायण राणे यांचे वय आणि आदित्य ठाकरेंच वय यामध्ये भरपूर अंतर आहे. तरीही नारायण राणेंनी आदित्य ठाकरेंकडून संयम कसा बाळगावा हे शिकून घेतल पाहिजे, असेही भुसे म्हणाले.

वाल्मिका नारायण राणेंचा पुन्हा वाल्या झाल्याची टीका अर्जुन खोतकर (shiv-sena-leader-arjun–khotkar) यांनी केली आहे. नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अर्वाच्य भाषेत टीका केली. शिवसेनाप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या नारायण राणेंकडून चांगल्या भाषेची अपेक्षा कशी करणार, असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे. दिल्लीतील एनसीबीच्या टीमतर्फे नारायण राणेंची चौकशी करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

राज्याचा मुख्यमंत्राचा एकेरी उल्लेख हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही. मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर आहे. नारायण राणेंच्या पत्रकार परिषदेनंतर महाराष्ट्र हेच ठरवेल की उद्धव ठाकरेंच्या मागे ठामपणे उभे रहायचं असे उद्य सामंत यांनी म्हटले आहे.