विनायक राऊतांची जोरदार टीका ! म्हणाले – ‘नारायण राणे नॉन मॅट्रिक, केंद्रात मंत्रिपद देण्याची वेळ म्हणजे दुर्दैवच’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सिंधुदुर्ग येथील खासदार नारायण राणेंच्या वैद्यकीय कॉलेजच्या उद्घाटन कार्यक्रमाला आले होते. परत एकदा शिवसेना-राणे वाद सुरू झाल्याचे दिसतो. तर नारायण राणेंना केंद्रात मंत्रीपद मिळण्याची चर्चा राज्यात सुरु आहे. यावर शिवसेनेने टीका केली आहे. तर आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर जोरदार टीका केली आहे.

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले, नारायण राणेंसारख्या नॉन मॅट्रिक माणसाला केंद्रात मंत्रिपद देण्याची वेळ आली, तर ते दुर्दैवच, असा टोला राऊत यांनी भाजपाला दिला आहे. तसेच कॉलेजच्या उद्घाटनासाठी मंजुरीच्या फाईलवर सही करण्यासाठी मातोश्रीवर फोन केल्याचे नारायण राणे यांनी सांगितले. मात्र, त्यापूर्वी विनायक राऊत यांनी देखील राणे सारखे सारखे मातोश्रीवर फोन करत असल्याचे म्हटले होते. त्याला राणे यांनी महिनाभराने कबुली दिली होती.

दरम्यान, अमित शहा सिंधुदूर्गमध्ये येऊन जात नाहीत तोच शिवसेनेने आमदार नितेश राणे यांच्या मतदारसंघातील वैभववाडी नगरपरिषदेचे ७ नगरसेवक फोडले आहेत. हे नगरसेवक लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असून यावर नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे हार, गुच्छ घेणार नसल्याने हे नगरसेवक व्हॅलेंटाईन गिफ्ट असल्याचे म्हटले होते. मात्र भाजपाने शिवसेनेला देखील आता इशारा दिला आहे. आमचे जेवढे नगरसेवक फोडले, त्याच्या पाच पटीने तुमचे फोडणार, असा इशारा निलेश राणे यांनी दिला आहे.

तसेच, शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी म्हटलेले आहे की, अमित शहा यांनी नारायण राणेंना कितीही बळ पुरवले तरी ते शिवसेनेला घाबरून मैदान सोडून पळ काढणार नाहीत, याची खातरजमा अमित शहा यांनी करून घ्यावी असा टोला त्यांनी लगावला होता. तसेच राणेंना कितीही ताकद दिली तरी पुढच्या निवडणुकीत शिवसेना त्यांना पुन्हा एकदा पराभूत करून भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही वैभव नाईक यांनी व्यक्त केला,