Narayan Rane | नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ, CRZ उल्लंघन प्रकरणी नोटीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे (BJP) नेते आणि केंद्रीय मंत्री (Union Minister) नारायण राणे (Narayan Rane) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबईतील बंगल्यावर याआधी मुंबई पालिकेनं Brihanmumbai Municipal Corporation (BMC) कारवाई केली होती. आता मुंबई महापालिकेनंतर मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने (Mumbai Suburban Collector) कारवाईचा बडगा उगारला आहे. नारायण राणेंना (Narayan Rane) नोटीस बजावली असून 10 जूनला हजर राहण्याचे आदेश दिले आहे.

 

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या जुहूतील अधिश या बंगल्याला (Adhish Bungalows) 2007 मध्ये पर्यावरण मंत्रालयाने सीआरझेड (CRZ Violation Case) अंतर्गत एनओसी (NOC) दिली होती. त्यातील दोन अटींचे उल्लंघन नारायण राणे यांनी केले असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. नियमांनुसार या बंगल्याचा एफएसआय (FSI) एक होता. त्याऐवजी 2.12 एफएसआय वापरला गेला. तसेच या बंगल्यासाठी 2810 चौरस मीटर बांधकामाची परवानगी (Construction Permission) होती. त्याऐवजी 4272 चौरस मीटर बांधकाम केले आहे. म्हणजे 1461 चौरस मीटर जादा बांधकाम केले असल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे.

 

सीआरझेड प्रकरणी उल्लंघन झाल्याबाबत सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाकडे (Coastal Management Authority) तक्रार आली होती. त्यानंतर मुंबई उपनगर जिल्हा किनारा क्षेत्र व्यवस्थापन कमिटीने यासंदर्भात मुंबई महापालिकेच्या अहवालाच्या आधारे नारायण राणे यांना नोटीस बजावली आहे. ही कमिटी मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत येते.

दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू (Juhu) परिसरातील अधिश बंगल्याबद्दल वाद मिटलेला नाही.
जुहू येथील अधिश बंगला पुर्णपणे पाडण्यात यावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेने बजावलेली नोटीस मागे घेतल्याने राणे यांना दिलासा मिळाला होता.

 

पण आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहचले आहे.
तक्रारीचे रुपांतर जनहीत याचिकेत झाले असून पुढील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
या याचिकेत निरव मोदीच्या (Nirav Modi) बंगल्या प्रमाणे राणेंचा अधिश बंगला पाडावा अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे.
त्यामुळे कोर्ट काय निर्णय देते हे पहावे लागेल.

 

Web Title :- Narayan Rane | notice issued by district collectors office to bjp leader and union minister narayan ranes for adhish bungalows

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

LIC Q4 Results | एलआयसीच्या नफ्यात झाली घसरण, गुंतवणुकदारांना मिळेल इतका लाभांश

 

HotStock Alerts | सीधा सौदा : असे स्टॉक्स ज्यामध्ये ट्रेड घेऊन तुम्ही करू शकता दमदार कमाई

 

Rupali Chakankar | राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी