Narayan Rane On Shivsena | ‘सत्तेसाठी शिवसेनेनं हिंदुत्वाला मुठमाती दिली, 2024 ला त्यांचा धुव्वा उडेल’ – नारायण राणे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Narayan Rane On Shivsena | मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी 3 एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. याच पार्श्वभूमीवर हनुमान जयंती (Hanuman Jayanti) दिवशी मनसेने हनुमानाची राज ठाकरेंच्या हस्ते आरती करत हनुमान चालिसेचं (Hanuman Chalisa) पठण केलं होतं. याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेने (Shivsena) अनेक ठिकाणी महाआरतीचं आयोजन केलं होतं (Hindutva Issue). याचाच धागा पकडत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

 

हिंदुत्व दाखवण्यासाठी काही तरी करायला लागतं आणि ते हृद्यापासून पाहिजे. मात्र शिवसेनेचा फक्त दिखावा चालू आहे. पण लोकं आता हे विसरणार नाहीत. सत्तेत जाण्यासाठी शिवसेनेने हिंदुत्वाला मुठमाती दिली, 2024 ला त्यांचा धुव्वा उडेल, असं भाकीतही नारायण राणे (Narayan Rane On Shivsena) यांनी केलं आहे.

 

हिंदुंवर हल्ले होतात, तेव्हा शिवसेना कुठे असते, उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) कुठे असतात ? आरत्या करुन, टाळ्या वाजवून आणि ढोल वाजवून हिंदुत्व सिद्ध होतं का ?, असं म्हणत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला.
यावेळी बोलताना राणे यांनी उत्तर कोल्हापूरमधील पोट निवडणुकीमध्ये (Kolhapur North By-election) झालेल्या भाजपच्या (BJP) पराभवावरही भाष्य केलं.

 

दरम्यान, कोल्हापूरमध्ये (Kolhapur) सर्व पक्ष एकत्र आले आणि भाजपची काही गणितं चुकली त्यामुळे भाजपला पराभवाचा सामना करावा लागला असल्याचं नारायण राणे म्हणाले.

 

Web Title :- Narayan Rane On Shivsena | BJP leader and union minister narayan rane criticizes shiv sena on hindutva issue

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा