Narayan Rane On Shivsena Dasara Melava | शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर नारायण राणे म्हणाले – ‘यावर कोर्टातून निकाल…’

मुंबई : Narayan Rane On Shivsena Dasara Melava | शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर कोर्टातून निकाल लागेल. शिंदे गटालाच (Maharashtra Cm Eknath Shinde) दसरा मेळाव्यासाठी (Dasra Melava) शिवाजी पार्कवर परवानगी मिळेल. शिवाय धनुष्यबाणही शिंदेंकडेच राहील. चांगल्या गोष्टींचे नेहमी कौतुक करावे, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना (shiv sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली. (Narayan Rane On Shivsena Dasara Melava)

नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरे यांना चांगले बोलताच येत नाही. त्यांच्याकडे चांगली वाक्य नसली तर त्यांनी मला फोन करावा. माझ्याकडे चांगली वाक्य आहेत. कोकणातील नाणार प्रकल्पावर राणे म्हणाले, हा प्रकल्प कोकणातच राहिल. नाणार होणारच आणि तोही कोकणातच होणार. विरोध चालू देणार नाही. नाणार प्रकल्प हातून जाऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मी स्वतः मंत्री आणि कंपनीच्या अधिकार्‍यांशी बोललो आहे. (Narayan Rane On Shivsena Dasara Melava)

राणे म्हणाले, 2024 ला भाजपचे 403 खासदार असतील. गोवा आणि दक्षिण मुंबईत भाजपाचेच खासदार असतील.
शिंदे गटाच्या खासदारांच्या मतदारसंघात भाजपच्या मंत्र्यांचे दौरे सुरू आहेत.
उद्धव ठाकरे यांचे अस्तित्व मुख्यमंत्री पद सोडले तेव्हाच संपले.
उध्दव ठाकरे देशात आणि राज्यात कुठेही नाहीत. फक्त मातोश्रीच्या कक्षेत त्यांचे अस्तित्व आहे.

नारायण राणे म्हणाले, लघू, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांना आर्थिक मदत केंद्र सरकार करत असते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भरची घोषणा केली. यासाठी उद्योग क्षेत्रात प्रगती होणे गरजेचे आहे.
रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे, निर्यात वाढायला पाहिजे. जीडीपी वाढावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.
देशात शिक्षणसंस्था कमी आहेत. माझ्या विविध शैक्षणिक संस्था आहेत, तेथे आम्ही दर्जेदार शिक्षण देत असतो.
देशात 26 टक्के निरक्षरता तर महाराष्ट्रात 18 टक्के निरक्षरता आहे.

Web Title :- Narayan Rane On Shivsena Dasara Melava | bjp leader and union  minister narayan rane criticism on shiv sena chief uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

NCP MP Supriya Sule On BJP | …क्रोनोलॉजी समजून घेतली तर हे उघड-उघड ब्लॅकमेलिंग, सरनाईक प्रकरणी सुप्रिया सुळेंचा भाजपावर निशाणा; म्हणाल्या – ‘आता माफी…’

T20 World Cup | विराट कोहली सलामीला खेळणार? कर्णधार रोहित शर्मा म्हणाला…