दादागिरी केली तर ‘मातोश्री’च्या आतलं आणि बाहेरचं सगळं बाहेर काढेन, नारायण राणेंचा CM ठाकरेंना इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कुणाला बेडूक म्हणताय ? आम्ही वाघ होतो म्हणून बाळासाहेब ठाकरे (Balasaheb thackeray) यांनी मला मुख्यमंत्री केलं. ते असते तर तुम्हाला कधीच मुख्यमंत्री केलं नसतं, असं सांगतानाच राणे कुटुंब आणि भाजपवर (bjp) टीका कराल तर याद राखा. दादागिरी कराल तर गेल्या 40 वर्षातलं मातोश्रीतलं (Matoshri) आतलं-बाहेरचं सगळं बाहेर काढेन, असा इशारा भाजपचे नेते आणि खासदार नारायण राणे (narayan rane) यांनी दिला आहे. नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची खिल्ली उडवत जोरदार टीका केली.

नारायण राणे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी उगाच वाघ असल्याचा आव आणू नये. खालच्या स्तरावरची भाषा वापरु नये. केवळ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर असल्याने मी शांत आहे. असेही नारायण राणे म्हणाले. उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या जीवावर एकही काम आजपर्यंत पूर्ण केलेलं नाही. आम्ही वाघ आहोत म्हणे, कोणी सांगितलं वाघ आहे.

पिंजऱ्यातला वाघ आहे की बाहेरचा ते पण स्पष्ट करा. शिवसेनेला सत्तेत आणून बसवलं कारण आम्ही वाघ होतो. बेडूक म्हणून नाही. उद्धव ठाकरे म्हणजे पुळचट माणूस. आमच्यावर बोललात तर याद राखा 40 वर्षात जे काही पाहिलं ते सर्व बाहेर काढेन असा इशारा देत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या हल्लाबोल केला.

मुख्यमंत्र्यांनी मुलाला क्लीन चिट दिलंय

मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या मुलाला क्लीन चिट दिलीय, पण आजही म्हणतो सुशांतसिंह राजपूतचा खून झाला आहे. त्यातील आरोपी गजाआड जातील, त्यात एक मंत्री, त्यांचा मुलगा पण असेल. सीबीआयने अजून केस बंद केलेली नाही, असं नारायण राणे म्हणाले.

बेईमानी करुन मुख्यमंत्रीपद मिळवलं

हिंदुत्वावर बोलण्याचा यांना अधिकार आणि नैतिकता नाही. यांचे 56 आमदार नरेंद्र मोदींच्या नावावर आलेत, नाहीतर 25 पण आले नसते. बेईमानी करुन, हिदुत्वाला मूठ माती देऊन त्यांनी पद मिळवलं असा माझा आरोप आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली.

You might also like