Narayan Rane | नारायण राणेंची बोचरी टीका, म्हणाले – ‘सेनेला संपवल्याचा राऊतांना आनंद झाला असेल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Shivsena Leader Eknath Shinde) यांच्या बंडामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेते आणि भाजप (BJP) एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. एकनाथ शिंदे आपल्यासोबत जवळपास 40 पेक्षा अधिक आमदारांना घेऊन राज्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे शिवसेनेला मोठे भगदाड पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्यावर बोचरी टीका केली आहे. नारायण राणे (Narayan Rane) यांनी ट्विटच्या माध्यमातून राऊतांवर टीकास्त्र सोडले आहे.

 

शिवसेनेला सत्तेतून खाली खेचल्याचा आनंद संजय राऊत यांना झाला असेल, अशा शब्दांत नारायण राणे (Narayan Rane) यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे.
राणे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, ‘संजय राऊत खूश! कारण त्याला शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याचा व शिवसेनेला संपवल्याचा आनंद झाला असेल. कपटी, कारस्थानी व दुष्ट बुद्धीच्या माणसाची ही कटकारस्थाने’, असे ट्विट त्यांनी केले आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

 

 

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या फोनवरुन चर्चा झाली होती.
त्यावेळी शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे संजय राऊतांबद्दल नाराजी व्यक्त केली होती.
संजय राऊत हे प्रत्यक्षात एक आणि प्रसारमाध्यमांसमोर दुसरं बोलत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला होता.
याच मुद्यावरुन आज नारायण राणे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

 

Web Title :- Narayan Rane | sanjay raut must be happy after shiv sena stepping down from power statement by central minister narayan rane

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Eknath Shinde | शिवसेनेच्या विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी भरत गोगावले यांची नियुक्ती; एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती

 

Constipation | बद्धकोष्ठतेचा त्रास आहे का?, मग या ३ पदार्थांपासून दूर राहा अन्यथा परिस्थिती आणखी बिघडेल!

 

Maharashtra Political Crisis | बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेकडून मोठ्या कारवाईला सुरुवात