Narayan Rane | ‘शरद पवार तोडगा कधीच काढत नाहीत, खेळवत ठेवणं त्यांचं काम’; नारायण राणेंचं टीकास्त्र

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन –   Narayan Rane | मागील काही दिवसांपासून एसटी कामगारांचे (ST workers strike) आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारी सेवेत समावेश करा या मागणीसाठी एसटी कामगारांचा राज्यव्यापी संप सुरू आहे. या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काॅग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यात बैठक झाली. मात्र, योग्य तोडगा निघाला नसल्याची माहिती आहे. या पार्श्वभुमीवर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) परिवहन मंत्र्यांवर निशाणा साधला आहे. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणेंनीही (Narayan Rane) प्रतिक्रिया दिली आहे.

 

सिंधुदुर्गमध्ये बोलत असाताना नारायण राणे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच या प्रकरणात केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा असं देखील राणे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, नारायण राणे यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर देखील टीका केली आहे. ”शरद पवार तोडगा कधीच काढत नाहीत, खेळवत ठेवणं हेच त्यांचं काम आहे. ते एसटी कामगारांच्या संपावर तोडगा काढणार नाहीत.” असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

 

Web Title : Narayan Rane | sharad pawar wont solve st workers strike issue narayan rane marathi news policenama

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

IISER Pune Recruitment 2021 | पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चमध्ये भरती; पगार 42,000 रूपयांपर्यंत

Beed Crime | लग्नानंतर सत्यनारायण पूजा होताच नवरदेवाची आत्महत्या; प्रचंड खळबळ

Darwin Electric Scooter | डार्विनची नवीन इलेक्ट्रिक टू-व्हीलर ! अवघ्या 68,000 रुपयात खरेदी करता येणार; शानदार फिचर्सही मिळणार