Narayan Rane | संजय राऊतांच्या खोचक टीकेला नारायण राणेंचे प्रत्युत्तर, म्हणाले …

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणे (Narayan Rane) यांना संधी देण्यात आली आहे. नारायण राणे (Narayan Rane) यांच्याकडे सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राणे यांची उंची दिलेल्या मंत्रालयापेक्षा मोठी असल्याचे म्हटले होते. दरम्यान, नारायण राणे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांच्या खोचक टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधाला आहे.

After Breakup | 85 वर्षांच्या आजीचा तरुण प्रियकराने केला प्रेमभंग, आता डेटिंग साईटवर ‘ही’ महिला बिनधास्त शोधतेय नवे प्रेम

Narayan Rane | sharad pawars call came narayan rane also replied sanjay raut

केंद्रीय पद ही मोठी जबाबदारी

नारायण राणे यांना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याचे मंत्रिपद देण्यात आले. परंतु त्या मंत्रिपदापेक्षा त्यांची उंची मोठी आहे. त्यांनी रोजगार आणि उद्योगांना संजीवनी द्यावी. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. असे संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यावर नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. केंद्रीय मंत्रिपद ही मोठी जबाबदारी आहे. हे खातं महत्त्वाचं आहे. कोणतंही खातं हे छोटं किंवा मोठं नसतं. मी जेव्हा खात्याचा कार्यभाग पाहीन आणि मी जेव्हा या खात्याला न्याय देईल, तेव्हा संजय राऊतांना कळेल की हे खातं किती महत्त्वाचं आहे, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.

Anil Deshmukh case । अनिल देशमुख यांच्या तपासाची व्याप्ती CBI ने वाढवावी, – मुंबई हाय कोर्टाचे निर्देश

शरद पवारांच्या फोनवरुन शुभेच्छा

नारायण राणे पुढे म्हणाले, मी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी मला फोन केला. चांगलं काम करा, असे ते म्हणाले. पण मुख्यमंत्र्यांनी मला शुभेच्छा दिल्या नाहीत. कारण त्याचे मन इतकं मोठं नाही. पण त्यांनी शुभेच्छा दिल्या नसल्या तरी संपूर्ण महाराष्ट्र आणि जिल्ह्यांमधून मला शुभेच्छा मिळाल्यात या मी त्यांच्या शुभेच्छा समजतो, असे राणे म्हणाले.

काय म्हणाले संजय राऊत ?

नारायण राणे यांना मंत्री केलं आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय दिलं आहे. नारायण राणे
यांची त्यापेक्षा मोठी आहे. ते राज्याचे मुख्यमंत्री होते, अनेक पदं त्यांनी सांभाळली आहेत, असं राऊत
म्हणाले. तसेच नारायण राणे यांच्यासमोर महाराष्ट्र आणि देशात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती
करण्याचं आणि कोरोना काळात कोलमडलेल्या उद्योगांना संजीवनी देण्याचं मोठं आव्हान असल्याचे
राऊत यांनी म्हटले.

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Narayan Rane | sharad pawars call came narayan rane also replied sanjay raut

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update