Narayan Rane | नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर गोंधळ ! नाशिकमध्ये BJP कार्यालयावर दगडफेक, मुंबईत भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा

मुंबई : Narayan Rane | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याबाबत नारायण राणे (Narayan Rane) यांनी केलेल्या अक्षेपार्ह वक्तव्यानंतर राज्यात संतप्त पडसाद (angry reactions) उमटत आहेत, राजकीय वातावरण चांगले तापले आहे. मंगळवारी नाशिकमध्ये शिवसैनिकांनी भाजपा कार्यालयावर दगडफेक केली (Shiv Sainiks pelted stones at the BJP office in Nashik) आणि नारायण राणे यांच्याविरोधात घोषणाबाजी सुद्धा केली.

राणेंच्या वक्तव्यावर संताप व्यक्त करत 4-5 शिवसैनिक नाशिक (Nashik) मध्ये भाजपा कार्यालयाबाहेर पोहचले आणि त्यानंतर मोठ-मोठ्या दगडांनी कार्यालयावर हल्ला केला. या हल्ल्यात कुणी जखमी झाल्याचे अद्याप वृत्त नाही.

Pune Farmer Suicide | आत्महत्येनंतर संबंधितांवर गुन्हे दाखल होतील पण, माझे वडील पुन्हा परत येतील का?

राणेंच्या घराबाहेर शिवसैनिकांची गर्दी

तर दुसरीकडे मुंबईत (Mumbai) भाजपा आणि शिवसैनिकांमध्ये चकमकीच्या घटना सुरू झाल्या आहेत. नारायण राणे यांच्या घराबाहेर शिवसैनिक आणि भाजपा कार्यकर्त्यांनी गर्दी करण्यास सुरूवात केली आहे.

दरम्यान, नारायण राणेंच्या घराबाहेर मोठ्या संख्येने पोलीस बळ तैनात करण्यात आले आहे. मुंबईशिवाय इतर जिल्ह्यात भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीचे वृत्त समोर येत आहे.

 

तीन पोलीस ठाण्यात राणेंविरूद्ध गुन्हे दाखल

तत्पूर्वी सोमवारी महाराष्ट्र पोलिसांनी सोमवारी नारायण राणे यांच्या विरूद्ध 3 पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले होते. पुणे (Pune), रायगड (Raigad) आणि नाशिक (Nashik) मध्ये नारायण राणे यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत (Crimes have been registered against Narayan Rane).

मीडिया रिपोर्टनुसार, पोलीस आता नारायण राणे यांना अटक करण्याच्या तयारी आहेत. नाशिक पोलीस कमिश्नर यांनी आदेश सुद्धा दिला आहे की, नारायण राणे यांना लवकरात लवकर अटक केली जावी.

काय आहे पूर्ण प्रकरण

हा संपूर्ण राजकीय वाद नारायण राणे यांच्या एका आक्षेपार्ह वक्तव्यावरून सुरू झाला आहे. सोमवारी
त्यांनी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत म्हटले होते
की,‘…जर मी तिथे हजर असतो, तर एक जोरदार कानशिलात मारली असती.‘

नारायण राणे यांनी म्हटले होते की, उद्धव ठाकरे आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात आपल्या मागे
उभ्या असलेल्या सहकार्‍याला विचारतात की, स्वातंत्र्याला किती वर्ष झाली, जर मी तिथे उपस्थित
असतो तर एक जोरदार कानशिलात मारली असती. नारायण राणे यांच्या याच वक्तव्यावरून
राज्यभरात वातावरण तप्त झाले आहे.

हे देखील वाचा

Ration Card | अपात्र रेशन लाभार्थ्यांना झटका, सरकार उचलत आहे मोठे पाऊल; जाणून घ्या

LIC Special Revival Campaign | बंद पडलेली LIC पॉलिसी पुन्हा करू शकता सुरू, जाणून घ्या कोणत्या अटींचे करावे लागेल पालन

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Narayan Rane | shiv sena workers stone pelting at bjp office in nashik about narayan rane statement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update