Narayan Rane | ‘सिंधुदुर्ग झालं आता राज्याकडे लक्ष’ !

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – Narayan Rane | सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत (Sindhudurg District Bank Election) भाजपने (BJP) गड राखला आहे. भाजप पुरस्कृत पॅनलने 19 पैकी 11 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला आहे. तर या निवडणुकीत महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) दारुण पराभव झाला आहे. यानंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या मेहनतीला यश मिळालं असून, या विजयाचं श्रेय जनता, भाजपचे कार्यकर्ते यांना जातं, त्याचबरोबर या बँकेवर आपली नाही तर भाजपची (BJP) सत्ता आल्याचे नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

माध्यमांंशी बोलताना नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले, ‘सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर विजय मिळवल्यानंतर आपलं लक्ष राज्याकडे असेल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. पुढे ते म्हणाले, राज्याला मुख्यमंत्री नसून, राज्य अधोगतीच्या मार्गावर आहे. तसेच राज्याला आता भाजपचा मुख्यमंत्री पाहिजे आहे,’ असं देखील राणे यांनी म्हटलं आहे.

पुढे नारायण राणे म्हणाले, ‘जिल्हा बँक ही स्थानिक शेतकऱ्यांसाठी असून, त्यांच्यासाठीच काम केलं जाईल. तसेच बारामतीसाठी आता या बँकेतून कर्ज दिलं जाणार नाही असं देखील त्यांनी सांगितलं आहे. तसेच, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 3 पक्ष एकत्र आले तरी ते जिंकू शकले नाही, ज्यांचे चेहरे सुद्धा पाहावत नाहीत, त्यांना लोक संधी देणार नसल्याचं ते म्हणाले.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी (Sindhudurg District Bank Election) झालेल्या निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी पार पडली. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळाली.
नंतर महाविकास आघाडीचा पराभव करुन भाजपने आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. त्यामुळे राणे समर्थकांनी जिल्ह्यात जोरदार जल्लोष केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा प्रतिष्ठेचा गड नारायण राणे (Narayan Rane) यांनी जिंकल्यानंतर राणे समर्थकांत उत्साहाचे वातावरण आहे.

Web Title : Narayan Rane | sindhudurg district bank election bjp leader and union minister
narayan rane criticizes shivsena

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुण्यात नागरिकांना त्रास देणार्‍या गुंडाला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला ! येरवडा पोलिसांचा स्वरक्षणार्थ हवेत गोळीबार

Government Scheme | ‘ही’ सरकारी योजना माजी सैनिकांच्या मुलींच्या लग्नासाठी देते 50,000 ची रक्कम; जाणून घ्या कसा मिळेल लाभ

Employees Pension Scheme | 300% पर्यंत वाढू शकते पेन्शन ! 7500 रुपयांवरून वाढून 25000 रुपये होईल पेन्शन, जाणून घ्या गणित

Multibagger Penny stock | 15 महिन्यात 1 लाखाचे झाले 68 लाख, टाटा ग्रुपची आहे कंपनी

Gram Ujala Scheme | 12 वॅट LED बल्ब अवघ्या 10 रुपयात! जाणून घ्या पूर्ण योजना आणि लाभ घेण्याची शेवटची तारीख