Narayan Rane | उद्धव ठाकरेंचे राजकारण मातोश्रीपूरते मर्यादीत, नारायण राणेंचे टीकास्त्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना पक्ष प्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करत निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंचे राजकारण मातोश्रीपूरते चालते, असा टोला नारायण राणे (Narayan Rane) यांनी लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते केंद्र सरकारच्या (Central Government) 10 लाख पदांच्या भरतीसाठी रोजगार मेळाव्याचा (Job Fair for Recruitment) शुभारंभ झाला. या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) देखील दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी पुण्यात प्रसार माध्यमांसोबत संवाद साधला. देशातील तरुणांना नोकऱ्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी 10 लाखांचा टप्पा आज आम्ही पार केला आहे, असे राणे म्हणाले.

तसेच यावेळी त्यांना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत (BMC Election) भाजपची (BJP) तयारी काय, उद्धव ठाकरेंना शह कसा देणार, अशी विचारणा करण्यात आली. त्यावर राणे म्हणाले, उद्धव ठाकरेंचा गट आणि शिवसेना राहिली कुठे आहे. 56 आमदारांतील 5- 6 आमदार शिवसेनेकडे शिल्लक आहेत.
ते सुद्धा लवकरच भाजपात प्रवेश करतील. ठाकरे सोडून महाराष्ट्रात आणि देशात बरेच काही आहे.
उद्धव ठाकरेंचे राजकारण मातोश्रीपूरते मर्यादीत राहीले आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) काळात ते माझे सहकारी होते.
तेव्हा ते आतासारखे नव्हते.

मागील आठवडाभर राणे कुटुंबीय शिवसेनेच्या ठाकरे गटाविरुद्ध आक्रमक आहेत. त्याचे कारण झाले भास्कर जाधव (Bhaskar Jadhav).
कुडाळ तालुक्यात आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांच्या विरोधात सुरु असलेल्या लाचलुचपत विभागाच्या
कारवाई (ACB) विरोधात मोर्चा निघाला होता. यावेळी भास्कर जाधव यांनी भाषण देत नारायण राणे पिता-पुत्रांचा
समाचार घेतला होता. यावेळी जाधवांनी राणेंवर मुंबईत भ्रष्टाचार केल्याचे देखील आरोप केले होते.

Web Title :- Narayan Rane | uddhav thackeray politics only matoshree area say narayan rane

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kishori Pednekar | घर फिरले की घराचे वासे फिरतात, पण शिवसेनेत मात्र वासे पहिले फिरले आणि आता…, किशोरी पेडणेकरांची ठाकरे-शिंदे-फडणवीसांवर टीकास्त्र

Pune Crime | समर्थ आणि अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यावर गुन्हे शाखेचे छापे, 18 जणांवर कारवाई