Narayan Rane | ‘राज्यामधील महाविकास आघाडी सरकार कोसळणार अन्….’, नारायण राणेंनी जाहीर केली तारीख

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Narayan Rane | राज्यात महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) पडणार असल्याचं भाष्य अनेक नेत्याकडून होताना दिसत आहे. दरम्यान, आज केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी एक मोठ विधान केलं आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार मार्च महिन्यात कोसळणार असल्याचा मोठा दावा त्यांनी केला आहे. ‘महाविकास आघाडी सरकार कोसळल्यावर मार्च महिन्यात महाराष्ट्रात भाजपचं सरकार येणार,’ असं राजकीय भाकीत राणेंनी केलं आहे. या विधानामुळे राज्यातील राजकीय वातावरणात चर्चेला उधाण आलं आहे.

 

नारायण राणे (Narayan Rane) हे आज (शुक्रवारी) जयपूर दौऱ्यावर होते. त्यावेळी बोलताना त्यांनी याबाबत विधान केलं आहे. ‘महाराष्ट्रात भाजपचं (BJP) सरकार नाहीये त्यामुळे तिथे तसं होत आहे. लवकरच महाराष्ट्रात भाजपचं सरकार येईल. मार्च महिन्यात भाजपचं सरकार येईल आणि तुम्हाला अपेक्षित असा बदल दिसून येईल. असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. तसेच, काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतील. जाहीरपणे गोष्टी गेल्या तर एखादा महिना सरकार आणखी राहिल आणि मग भाजपचं सरकार येण्याची तारिखही पुढे जाईल. असं नारायण राणे म्हणाले.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची आज दिल्लीत भेट घेतली आहे.
यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संबंधित काही बैठका आहेत आणि त्या बैठकीसाठी हे दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले आहेत.
यासोबतच राज्यातील भाजपच्या अनेक नेत्यांचं पूर्नवसन सुरू आहे.
चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) यांना विधानसभेचं तिकीट नाकारलं होतं
त्यांना आता विधानपरिषदेवर संधी देण्यात आली आहे.
विनोद तावडे (Vinod Tawde) यांचीही राष्ट्रीय सरचिटणीसपदावर वर्णी करण्यात आलीय.
यासाठी दिल्ली दौरा असल्याचंही म्हटलं जातंय.

 

Web Title :- Narayan Rane | union minister and bjp leader narayan rane claims that mahavikas aghadi government collapsed in march and bjp will be in power in maharashtra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Multibagger Penny Stock | रु. 1.85 चा शेयर 97 रुपयांचा झाला, दिड वर्षात 1 लाखाचे झाले 52 लाख, दिला 5150% रिटर्न; तुमच्याकडे आहे का?

Pune NCP | ‘लसीकरणाचे योगदान देत आहेत पुनावाला आणि बॅनरबाजी करत आहेत चूनावाला’, राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून ‘थँक्यू टॅक्स पेयर’ बॅनर लावून निषेध

Legislative Council Elections | काँग्रेसचे सतेज पाटील यांची बिनविरोध निवड, महाडिक यांची माघार