Narayan Rane | नारायण राणेंना हायकोर्टाचा मोठा दिलासा; मुंबई उच्च न्यायालयानं दिला हा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Narayan Rane | भाजप नेते आणि केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या मुंबईमधील जुहू येथील ‘अधीश’ बंगल्याच्या वाद प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून (Mumbai High Court) राणेंना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई महानगरपालिकेने Brihanmumbai Municipal Corporation (BMC) पाठवलेल्या नोटिशीवर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

 

अधीश बंगल्यामध्ये कथितरित्या बेकायदा बांधकाम झाल्याचा आरोप आहे.
मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या पत्नी नीलम राणे (Neelam Rane) आणि पुत्र निलेश राणे (Nilesh Rane) हे संचालक असलेल्या आर्टलाइन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड (Artline Properties Pvt) या कंपनीचे कालका इस्टेट्समध्ये 18 ऑक्टोबर 2017 रोजी विलीनीकरण झाले.
त्याचबरोबर कालका इस्टेट्समध्ये राणे कुटुंबीयांचे समभाग आहेत.
त्यामुळे राणे परिवार या बंगल्यामध्ये वास्तव करत आहे. मुंबई महापालिका कायद्याच्या विविध कलमांचा भंग करत या बंगल्यात बेकायदा बांधकाम झाल्याचा आरोप आहे.
म्हणून महापालिकेकडून राणेंना नोटीस बजावली होती.
त्यानंतर पालिकेच्या पथकानं पाहणी देखील केली होती.

हाच वाद आता मुंबई हायकोर्टात (Bombay High Court) गेला आहे. बंगल्याची मालकी असलेली कंपनी कालका रिअल इस्टेट व संचालक कांता रामचंद्र राणे (Kanta Ramchandra Rane) यांनी मुंबई महापालिकेच्या नोटिसा आणि आदेशांना आव्हान देणारी रिट याचिका (Petition) न्यायालयात दाखल केली.
या याचिकेवर आज (मंगळवारी) प्राथमिक सुनावणी घेण्यात आली.
बी याचिका न्यायालयाने निकाली काढली असून, महापालिकेच्या नोटिशीवर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.
तसेच या तीन आठवड्यांत राणेंना पुन्हा उच्च न्यायालयात दाद मागण्याची मुभा दिली गेली आहे.
यामुळे राणेंना न्यायालयाचा एक दिलासा मिळाला आहे.

 

दरम्यान, राणे यांचा ‘अधीश’ बंगला वाचवण्यासाठी मुंबई महापालिकाच प्रयत्न करत असल्याचा आरोप तक्रारदार संतोष दौंडकर (Santosh Daundkar) यांनी केला आहे.
पंधरा दिवसामध्ये अवैध बांधकाम पाडण्याची नोटीस दिली असताना, चार दिवसांत पुन्हा 15 दिवसांची मुदत देणारी नवी नोटीस अर्थात वेळकाढूपणाचा प्रयत्न आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.
या दरम्यान, या बंगल्यासाठी अनेक नियमांची पायमल्ली केल्याची लेखी तक्रार त्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडेच केली आहे.

 

Web Title :- Narayan Rane | Union minister and bjp leader narayan rane gets relief by bombay high court
in adhish bungalow

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा