Narayan Rane | दोन राऊतच शिवसेनेला पार खोल डुबवणार – नारायण राणे

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन –  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणेंना (Narayan Rane) अटक केली होती. यावरून राज्यात शिवसेना आणि भाजप (Shiv Sena and BJP) आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर राणेंना जामीन देखील मिळाला. या दोन दिवसाच्या झालेल्या नाट्य घडामोडीनंतर आज नारायण राणेंची (Narayan Rane) जन आशीर्वाद यात्रा (Jan Ashirwad Yatra) सुरूय. त्यावेळी त्यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत आणि विनायक राऊत हे दोन राऊत शिवसेनेला पार खोल बुडवणार आहेत, अशा शब्दात त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे रत्नागिरी (Ratnagiri) येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी शिवसेनेवर अनेक मुद्यावरून निशाणा साधला.
त्यावेळी बोलताना ते म्हणाले, संजय राऊत आणि विनायक राऊत हे दोघेही माझ्या दृष्टीने वायफळ बडबड करणारे नेते आहेत. संजय राऊतांना त्याचसाठी ठेवलं आहे.
संपादक सोडा त्यांना हे बोलायलाच ठेवलंय. काय तो विनायक राऊत.
ते दोन राऊतच शिवसेनेला (Shiv Sena) डुबवणार आहेत.
आतमध्ये एकदम खोल तलावात, अशा शब्दात त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
विनायक राऊतांचं नाव घेऊन तुम्ही मूड खराब करता.
त्यामुळे मला संध्याकाळचं जेवण टाळावं लागेल, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

भाजपमधील (BJP) बाहेरच्या घुसखोरांनी वातावरण खराब केल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली होती. यावरूनही नारायण राणेंनी प्रत्युत्तर दिले आहे.
त्यावेळी ते म्हणाले, ‘भाजपची ओरिजिनल आयडॉलॉजी (Original Ideology) स्वीकारूनच आम्ही पक्षात प्रवेश केलाय.
ओरिजिनल असो काही असो भाजपला परवडतोय ना आम्ही.
मग या बाहेरच्यांचं काय ऐकाय आहे? असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

 

पुढे बोलताना नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले, ‘राणेंच्या पाठी लागू नका.
नाही तर मी आता थोडंच बोलतोय, सर्वच बोलावं लागेल. ते परवडणार नाही.
मी क्रिमिनिल होतो तर मुख्यमंत्री कसं केलं? मंत्री, आमदार, नगरसेवक शाखाप्रमुख कसं केलं? तेव्हा विरोध का केला नाही? असा सवाल नारायण राणे यांनी विचारला आहे.
साहेबांना जेव्हा अतिरेक्याकंडून धोका होता, साहेबांना जेव्हा मातोश्री सोडायला सांगितलं.
तेव्हा साहेबांनी सुपुत्राला सोबत घेतलं नाही, असं देखील नारायण राणेंनी म्हटलं आहे.

 

Web Title : Narayan Rane | union minister narayan rane attacks sanjay raut and vinayak raut

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Union Minister Narayan Rane | ‘आम्ही विरोधी पक्षात बसायला जन्माला आलो नाही, आम्हीही सत्तेत येऊ’

Pune News | पुण्यातील हवेली प्रांत अधिकारी बारवकर यांची तडकाफडकी बदली

Shivsena Vs MNS | मनसेची शिवसेनेवर बोचरी टीका