Narayan Rane | ‘संजय राऊत रात्री करायचं ते दिवसा करतात’ – नारायण राणे (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये नारायण राणे यांनी राज्यातील आघाडी सरकारवर (MVA government) जोरदार हल्ला चढवला. तसेच चालु घडामोडींवर भाष्य करताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), संजय राऊत (Sanjay Raut) आणि राष्ट्रवादीचे (NCP) प्रवक्ते अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर टोलेबाजी केली. रात्री जे करायचं ते दिवसा करत असल्याने संजय राऊतांना भान राहत नाही, अशा शब्दात नारायण राणे (Narayan Rane) यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला.

 

संजय राऊत हवेतली विधाने करतात

 

नारायण राणे म्हणाले, माननीय संजय राऊतांचे अग्रलेख वाचले. अपक्ष उमेदवाराने दादरा नगर हवेलीची (Dadra Nagar Haveli) जागा जिंकली.
ती आम्ही जिंकली असा डंका पिटला. संजय राऊत काहीतरी हवेतली विधाने करतात.
हास्यास्पद दावे करतात, काहीही अग्रलेख लिहितात, असं राणे यांनी म्हटले आहे.
मला वाटतं रात्री जे कराययचं ते दिवसा करत असल्यानं राऊतांना भान राहत नाही.
त्यांनी लिखाण करताना भान नसतं, अशा शब्दात राणे (Narayan Rane) यांनी राऊतांवर टीका केली

तर डोकं राहणार नाही जागेवर

 

तुम्ही जे जिंकून आलात ते मोदींच्या (Narendra Modi) भरोश्यावर. आधी युती केली आणि मग गद्दारी केली.
मिडीयाने काही लोकंना सांभाळून घेतलं, असंही राणे म्हणाले.
मोदी सरकार (Modi government) बहुमतात आहे, तुम्ही तिथे धडक मारणार.
पण धडक कशी असते ते माहित नाही वाटतं. दिल्लीला धडक मारायला आलात तर डोंक राहणार नाही जागेवर.
डोक्याविना संजय राऊत दिसेल तिकडे, असा हल्लाबोल राणेंनी केला.

 

भाजपवर, मोदीवर टीकेचा भडिमार करतायत, संपलं आता यांचं म्हणे. आता तुम्ही जे 56 आमदार आहात, ते मोदींमुळेच निवडणून आलेले आहेत.
अन्यथा 8 च्या वर जात नाहीत तुम्ही, असा टोला राणेंनी शिवसेनेला (Shivsena) लगावला.

 

Web Title : Narayan Rane | union minister narayan rane press conference criticism on shivsena mp sanjay raut

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Narayan Rane | ‘शिवसेनेला दुसऱ्यांच्या मुलांचं बारसं करण्याची सवय’ – नारायण राणे (व्हिडिओ)

Viruses | तुमच्या फोनमध्ये असू शकतात कोट्यवधी धोकादायक किटाणू ! त्यांच्यामुळे होणार्‍या जीवघेण्या आजारापासून वाचण्याचे ‘हे’ 4 उपाय

7th Pay Commission | ‘या’ सेक्टरच्या कर्मचार्‍यांना सुद्धा येणार वाढीव पगार, नोव्हेंबरपासून महागाई भत्त्यात झालीय वाढ