Narayan Rane | पुण्यात येऊन बारा वाजवीन, नारायण राणेंचा अजित पवारांना इशारा

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – माझ्या फंद्यात पडू नका, अन्यथा पुण्यात येऊन बारा वाजवीन असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना दिला. पवार यांना बारामतीशिवाय काय राजकारण कळते, असा सवालही नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला. ते रविवारी (दि.25) कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलत होते.

चिंचवड येथे बोलताना अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर बोचरी टीका केली होती. शिवसेना (Shivsena) आणि शिवसेनेला सोडून गेलेले कसे पराभूत झाले हे सांगताना त्यांनी नारायण राणेंना तर वांद्रेत बाईनं पाडलं अशी बोचरी टीका अजित पवार यांनी केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना नारायण राणे म्हणाले की, महिला असो की पुरुष तो उमेदवार असतो. त्यामुळे कोणाकडून पराभव झाला हे महत्त्वाचे नसते.

औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतरावरुन त्यांनी टोला लगावला. नामांतरावरुन सगळेच श्रेय घ्यायला येतील.
मी केलं, मी केलं, काय केलं तू? मराठी भाषेतील विशेषण कुठेही वापरतो, असे राणे म्हणले. कोणता पक्ष संपायला मी काही जोतिष नाही, जे लोक काम करतात त्यांचा पक्ष टिकतो, बाकीचे संपून जातात, असेही त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधताना नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्याकडे
काय राहिलं आहे? कुठलंही अस्तित्व नाही, काही नाही. गेलेले लोक काय म्हणतात आपल्याबद्दल ते पहा.
अडीच वर्षात आपण काय केलं ते पहावं असं राणे म्हणाले.

Web Title :- Narayan Rane | union minister narayan rane sharp attack on ajit pawar over remark lose against women in by election

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Kasba Peth Bypoll Election | निवडणूक हरण्याच्या भीतीपोटी भाजप लोकशाहीचा गळा घोटत आहे – रवींद्र धंगेकर

Parbhani Accident News | दुर्दैवी ! रुग्णालयात जाताना आजोबा आणि नातवाचा भरधाव बसच्या टायरखाली चिरडून मृत्यू

Pune Crime News | खराडीत जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 16 जणांवर कारवाई