Narayan Rane | नारायण राणे आणि पत्रकारांमध्ये शाब्दिक बाचाबाची, म्हणाले-‘तुम्ही पत्रकार नसून शिवसेनेचे प्रवक्ते’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी बुधवारी (दि.1) सादर झालेल्या अर्थसंकल्पासंदर्भात (Budget-2023) पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी पत्रकारांनी पेट्रोल (Petrol) आणि गॅस सिलेंडर दरवाढीवरुन (Gas Cylinder Price Hike) नारायण राणे (Narayan Rane) यांना प्रश्न विचारला. त्यावळी राणे यांनी पत्रकारांना थेट शिवसेनेचे प्रवक्ते (Shiv Sena spokesperson) असल्याचे म्हटले. यानंतर पत्रकार आणि नारायण राणे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाली.

 

पत्रकार परिषदेमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी नारायण राणे (Narayan Rane) यांना अहमदाबादसाठी तरतूद होते, परंतु मुंबईसाठी होत नाही असे विचारले. त्यावेळी राणे म्हणाले, आम्ही मुंबईसाठी तरतूद करत आहोत आणि करायला लावू, मुंबईला कोणत्याही प्रकल्पासाठी पैसे लागले तर आम्ही ते उपलब्ध करुन देऊ. ते आमचं ऐकतील एवढा आम्हाला विश्वास आहे.

तुम्ही शिवसेनेचे प्रवक्ते
सर्व सामान्यांना पेट्रोल, गॅस दरवाढीवर दिलासा मिळण्याची अपेक्षा होती यावर प्रश्न विचारला असता नारायण राणे म्हणाले, तुम्ही पत्रकार नाही, तर सोशल वर्कर झाला आहेत किंवा शिवसेनेचे प्रवक्ते झाले आहात. यावर पत्रकारांनी आक्षेप घेतला. तसेच प्रश्न विचारल्याने कोणी प्रवक्ते होत नाही. प्रश्न विचारणे आमचे काम आहे, अशा शब्दात राणे यांना सुनावले.

 

महागाईचा अर्थसंकल्पाशी संबंध काय?
पत्रकारांनी राणे यांच्यावर आक्षेप घेतल्यानंतर, ते म्हणाले, अर्थसंकल्प पूर्ण वाचा. अर्थसंकल्प खूप मोठा आहे
आणि मी प्रत्येक गोष्टीवर विस्तार सांगू शकत नाही. सविस्तर माहिती घेता येईल म्हणून मी पत्रकार परिषद सायंकाळी पाच वाजता घेतली.
प्रत्येक तरतूद सांगता येणार नाही. एखाद्या लोकप्रतिनिधीशी बोलताना तुम्ही ग्राह्य धरता हे काय आहे.
तुम्ही जे बोलला त्याचा अर्थसंकल्पाशी संबंध काय आहे? असा सवाल राणे यांनी विचारला.

Web Title :- Narayan Rane | Verbal exchange between Narayan Rane and journalists, said – ‘You are not a journalist but a spokesperson of Shiv Sena’

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Budget 2023 | ‘हा तर महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार..;’ केंद्रीय बजेटवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची टीका

Kolhapur Police Inspector / API Transfer | कोल्हापूर पोलीस : 18 पोलीस निरीक्षक आणि 5 सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

Pune By Elections | कसब्याची जागा आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच! इच्छुकांची मोठी यादी