नितेशच्या कृत्यावर नारायण राणेंची नाराजी ; म्हणाले, ‘ते योग्य नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस आमदार नितेश राणे आणि कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांसमवेत महामार्गाच्या दुरावस्थेमुळे उपअभियांत्याला गडनदीच्या पुलावर बांधून ठेवले. तसेच त्यांच्या अंगावर चिखलाचे पाणी ओतले. नितेश राणे यांच्या कृत्यावर मात्र वडील नारायण राणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबई-गोवा महामार्गवर चिखल आणि खड्डे झाल्याने त्रासाला कंटाळलेल्या कणकवलीकरांच्या रोषाचा सामना महामार्गाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना करावा लागला. आमदार नितेश राणे यांनी शेडेकर यांच्यावर चिखल ओतला. कोकणात सतत पाऊस सुरु असल्याने रस्ताचे तीनतेरा वाजले आहेत. सर्वत्र चिखलाचे आणि खड्यांचे सम्राज्य झाले आहे.

मात्र, पुत्राच्या या चिखलफेक आंदोलनावर नारायण राणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नितेशचे वागणे चुकीची आहे. महामार्गवर झालेले हे आंदोलन योग्य आहे, मात्र आंदोलन करण्याचा मार्ग आणि कृती योग्य नसल्याचे नारायण राणे यांनी स्पष्ट केले. हिंसा झालेल्या आंदोलानाचे मी कधीही समर्थन करु शकणार नाही असे देखील नारायण राणे म्हणाले.

आता वडीलांनीच नाराजी व्यक्त केल्याने नितेश राणे यांच्या कृतीचे समर्थन करणाऱ्या स्वाभिमानीच्या पक्ष कार्यकर्त्यांनी काय समजावे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

आरोग्यविषयक बातम्या

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात
दररोज ‘हळदीचे पाणी’ घ्या आणि आश्चर्यकारक फायदे मिळवा
लुक बदलायचायं ? मग ‘या’ मेकअप टीप्स फॉलो करा
अशा प्रकारेदेखील खावू शकता भाज्या, होतील अनेक फायदे