‘मातोश्री’ उडवण्याचा दहशतवाद्यांचा कट होता, राणेंचा खळबळजनक खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – १९८९ मध्ये ठाकरे कुटुंबीयांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीला दहशतवाद्यांनी बॉम्बने उडवून देण्याची योजना आखली होती, असा खळबळजनक खुलासा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपल्या आत्मचरित्रात केला आहे. दहशतवद्यांची योजना समजल्यानंतर ठाकरे कुटुंबातील प्रत्येक सदस्याला काही दिवसांसाठी सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले होते. असे देखील त्यांनी आपल्या आत्महचरित्रात म्हटले आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून याची कल्पना दिली होती.

ठाकरे हे खलिस्तानी दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर होते. त्यावेळी फुटीरदावादी मुंबईसह राज्यातील अनेक शहरात सक्रिय होते. १९ मार्च १९८९ मध्ये बाळासाहेब ठाकरेंनी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्या पत्रकार परिषदेत प्रश्नावलीचे वाटप करण्यात आले होते. यामध्ये त्यांनी शीख समुदाय फुटीरतावाद्यांना फंडिंग करत राहिल्यास सामाजिक आणि आर्थिक स्वरुपात बहिष्कृत केले पाहिजे. नारायण राणे यांनी आपल्या आत्मचरित्रात तीन प्रमुख घटनांचा उल्लेख केला आहे. यामध्ये शिवसेनेचा १९८९ मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील पराभव झाला. त्यामुळे ठाकरे कमकुवत झाले होते. कारण राज्याची सुरक्षा काँग्रेच्या हातामध्ये होती. यामुळे बाळासाहेबांनी मातोश्रीची सुरक्षा वाढवली.

नारायण राणे यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीबद्दल उल्लेख केला आहे. उद्धव ठाकरे यांना तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी अचानक फोन करून बोलावून घेतले. विशेष म्हणजे शरद पवारांनी त्यांना एकट्याला येण्यास सांगितले. यावेळी शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना दहशतवाद्यांकडून मातोश्री उडवून देण्याच्या योजनेबाबत सांगितले. तसेच मातोश्रीमधीलच काही लोकांचा या कटामध्ये सहभाग असल्याचे पवारांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले असल्याचा उल्लेख आत्मचरित्रात करण्यात आला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like