अखेर ठरलं ! नारायण राणेंचा 2 ऑक्टोबरला भाजपात प्रवेश

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन – माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे 2 ऑक्टोबरला भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आमदार नितेश राणे यांनी राणेंच्या भाजपा प्रवेशाला दुजोरा दिला आहे. काँग्रेस सोडल्यापासून राज्याचे नारायण राणे भाजप प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. भाजपकडून त्यांना राज्यसभेत खासदारकीही देण्यात आली आहे. मात्र अद्याप त्यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश झाला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार,  चर्चगेटच्या गरवारे हॉलमध्ये 2 ऑक्टोबरला सायंकाळी 4 वाजता राणे भाजपामध्ये पक्षप्रवेश होणार असून, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षही ते भाजपामध्ये विलीन करणार आहेत.

महिनाभरा पूर्वीच नारायण राणे यांनी महाराष्ट्रात स्वाभिमान पक्षात राहणार की भाजपमध्ये जाणार याचा निर्णय येत्या 10 दिवसांत घेणार जाहीर केले होते. मात्र त्यांचा पक्षप्रवेश रखडलेलाच आहे. मूळचे शिवसेनेमध्ये असलेले नारायण राणे 2005 ला काँग्रेसमध्ये गेले. 2017 मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम करत ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ या नवीन पक्षाची स्थापना केली. सध्या ते भाजपाच्या पाठिंब्यावर राज्यसभेत खासदार आहे. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर राणेंनी  भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी  प्रयत्न केले.  युतीमधील काही नेत्यांच्या विरोधामुळे त्यांचा भाजपप्रवेश अद्याप रखडलेलाच आहे.

Visit : Policenama.com