राणेंच्या भाजपा प्रवेशाची तारीख निश्चित, त्याच दिवशी पक्ष भाजपात करणार ‘विलिन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोकणातील नते आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नेते नारायण राणे यांना अखेर भाजपामध्ये प्रवेश करण्याचा मुहूर्त सापडला आहे. येत्या १ सप्टेंबर रोजी ते भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. त्याचबरोबर ते आपला महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष भाजपामध्ये विलीन करणार आहेत. भाजपा प्रवेशेच्या वृत्ताला स्वत: नारायण राणे यांनी दुजोरा दिला आहे.

बेस्ट संयुक्त कृती समितीने अनेक मागण्यासाठी उपषोषण सुरु केले आहे. यावेळी कामगार नेते शशांक राव यांची प्रकृती खालवल्याने त्यांना भेटण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी नारायण राणे आले होते. त्यावेळी पत्रकारांनी तुम्ही १ स्पटेंबरला भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा दिवसभर सुरु आहे. सुरु असेलेली चर्चा खरी आहे का ? या वर उत्तर देताना नारायण राणे यांनी तुम्ही ऐकले ते खरे आसल्याचे सांगून रविवारी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत त्यांनी दिले. नारायण राणे यांच्या सोबत त्यांचे चिरंजीव नितेश आणि निलेश राणे हे देखील भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.
भाजपाची स्वबळावर लढणार ?

भाजपामध्ये अनेक दिग्गज नेते प्रवेश करत आहेत. इतर पक्षातून येणाऱ्या आमदारांची संख्या वाढत असून या आमदरांना तिकीट देण्यासाठी भाजपाने स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केल्याचे बोललं जातय. त्यामुळेच कोकणातही भाजपची ताकद वाढविण्यासाठी शिवसेनेच्या विरोधानंतरही राणे यांना भाजपात प्रवेश देण्याचा निर्णय घण्यात आला असल्याचे सुत्रांकडून समतंय.

आरोग्यविषयक वृत्त –