अमित शहा आणि नारायण राणे यांची होणार गुप्त बैठक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- महाराष्ट्रातील खासदारांसोबत आज अमित शहा बैठक घेणार आहेत. त्या बैठकीला महाराष्ट्र्र स्वाभिमानी पक्षाचे सर्वेसर्वा नारायण राणे हे देखील उपस्थित राहणार असून त्यांची आणि अमित शहा यांची पुन्हा स्वतंत्र्य बैठक पार पडणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हि बैठक होत असल्याचे बोलले जात आहे.तर खासदारांच्या कामाचे मूल्यमापन देखील या बैठकीत केले जाणार आहे.

भाजपच्या एबी फॉर्म वर नारायण राणे हे राज्यसभेवर निवडून गेले आहेत. त्यासाठी त्यांनी तेव्हा महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा हि दिला होता. अमित शहा आणि नारायण राणे यांच्यात होणाऱ्या स्वतंत्र बैठकीत नारायण राणे आणि अमित शहा नेमक्या कोणत्या विषयावर बोलणार आहेत.हे पाहण्या सारखे राहणार आहे. मात्र त्यांच्या बैठकीतील चर्चा माध्यमांच्या प्रतिनीधी पर्यंत पोहचेलच असे नाही.

नारायण राणे भाजप मध्ये सामील व्हायला मध्यतंरीच्या काळात तयार झाले होते. मात्र त्यांच्या भाजप सहभागाला शिवसेनेने आक्षेप घेतला. त्यानंतर त्यांनी आपला स्वतःचा पक्ष काढणे उचीत मानले त्यातूनच त्यांच्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाची स्थापना झाली. नारायण राणे यांनी आपण भाजपात सहभागी होताच आपणास देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्री मंडळात मंत्री पद द्यावे अशी मागणी केली होती. परंतु शिवसेनेच्या दबावामुळे भाजप त्यांना मंत्रिपद देऊ शकले नाही.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांना निवडणून आणण्याचे कडवे आव्हान नारायण राणे यांच्या समोर असणार आहे.तर मागील निवडणुकीत त्यांच्या मुलाचा पराभव करत शिवसेनेने हा मतदारसंघ आपल्या नावा वर करून घेतला होता. शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी या मतदारसंघात विजयावर नाव कोरत निलेश राणे यांचा दणदणीत पराभव केला होता. आता हा मतदारसंघ पुन्हा काबीज करण्यासाठी नारायण राणे शर्थीचे पर्यत करणार आहेत. याच सर्व बाबींवर चर्चा करण्यासाठी अमित शहा यांनी नारायण राणे यांच्या सोबत गुप्त बैठकीचे आयोजन केले आहे.