Drugs Case : सुशांत सिंह राजपूतच्या ‘मॅनेजर’ला ड्रग केस प्रकरणी अटक !

पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) केसमध्ये ड्रग्ज अँगलचा तपास करणाऱ्या नारकोटीक्स कंट्रोल ब्युरो (NCB) नं ड्रग्ज प्रकरणी अनेकावंर कारवाई केली आहे. आता ड्रग्ज प्रकरणात सुशांतच्या मॅनेजरला अटक करण्यात आली आहे.

 

 

 

 

 

सुशांतचा मॅनेजर ऋषीकेश पवार हा चेंबूर येथे राहतो. त्याला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलं होतं. परंतु तो मात्र फरार झाला होता.

एनसीबीनं कारवाई करत त्याच्या घरी धाड टाकली होती. त्याच्याकडील लॅपटॉपमध्ये महत्त्वाची माहिती होती. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याची हार्ड डिस्क जप्त केली आहे. एनसीबी अधिकाऱ्यांकडे ऋषीकेश विरोधात अनेक पुरावे आहेत. अटक टाळण्यासाठी ऋषीकेशनं सेशन कोर्टात धाव घेतली होती. परंतु कोर्टानं त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता.