अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या बॉडीगार्डची सलग दुसर्‍या दिवशी चौकशी

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येला या महिन्यात एक वर्ष पूर्ण होत आहे. राजपूत यांच्या मृत्युशी संबंधित संभाव्य मादक द्वव्याचा नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB)  तपास करीत आहे. एनसीबीने आता अभिनेत्याच्या बॉडीगार्डसह त्याच्या स्टाफमधील काही सदस्यांची चौकशी केली आहे. सुशांतच्या आत्महत्येस एक वर्ष होत असतानाही एनसीबीची (NCB) चौकशी अजूनही संपलेली नाही, हे या घडामोडीवरुन दिसत आहे.

एनसीबीने सुशांतसिंग राजपूत याच्या बॉडीगार्डकडे काल दिवसभर चौकशी केली़ राजपूत याच्या मृत्युशी जोडलेल्या औषधांच्यावर प्रकरणात प्रश्न विचारण्यात आले.

 

 

बॉडीगार्डकडे आजही चौकशी करण्यात येणार असून तसेच समन्स एनसीबीने दिले आहे.एनसीबीने रविवारी सुशांतचे माजी घरकामगार नीरज आणि केशव यांचीही चौकशी केली होती. तसेच सुशांतच्या मृत्युशी संबंधित ड्रग्स प्रकरणात हरीश खान या एका ड्रग पेडलरलाही अटक केली आहे.

त्याशिवाय एनसीबीने सुशांतचा माजी फ्लॅटमेट आणि सहयोगी सिद्धार्थ पिठानी याला ड्रग प्रकरणात हैदराबाद येथून २९ मे रोजी अटक केली. हैदराबाद येथील कोर्टातून ट्रान्झिट वॉरंटवर मुंबईत आणण्यात आले आहे. त्याच्याकडेही चौकशी सुरु आहे.

 

Also Read This : 

 

Nagar : भाजपा पदाधिकाऱ्यांची भूमिका, म्हणाले – ‘महापौरपदाच्या निवडणुकीत तटस्थ राहू, आता राष्ट्रवादीचा पाठिंबा नको’

 

केवळ इम्यूनिटी मजबूतच नव्हे तर केस गळती देखील थांबते पांढर्‍या कांद्याच्या सेवनामुळं, जाणून घ्या हैराण करणारे फायदे

 

Maharashtra : 8 वर्षाच्या मुलाकडून साफ करून घेतले कोरोना रूग्णांचे टॉयलेट, वायरल झालाव्हिडीओ

 

अति गरम पाणी पिण्यामुळं होतात ‘हे’ 4 मोठे नुकसान, जाणून घ्या

 

फायजर-मॉडर्नानंतर आता सीरमने मागितली कायदेशीर कारवाईतून सूट, म्हटले – ‘सर्वांसाठी असावा एकच नियम’

 

पाठीच्या मणक्याच्या वेदना आणि प्रतिबंधात्मक उपाय; जाणून घ्या