ड्रग माफियांसोबत होता रिया चक्रवर्ती आणि सुशांतच्या मित्रांचा संबंध, NCB करणार चौकशी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू संदर्भात आता नवा खुलासा समोर आला आहे. यासंदर्भात नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने एक एफआयआर दाखल करून चौकशी सुरु केली आहे. ईडीच्या टीमला चौकशी दरम्यान एक माहिती मिळाली आहे की, सुशांतच्या घरी येणाऱ्या अनेक जणांचा संबंध ड्रग माफियांसोबत होता. दुबईपासून ते मुंबई पर्यंतच्या अनेक ड्रग माफियांशी संबंध असलेली माहिती समोर आल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी ईडीने एनसीबीला पत्र लिहिलं आहे. या प्रकरणाला गंभीररित्या घेत नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या टीमने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या रडार वर कोण कोण आरोपी?
नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो टीम रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती, श्रुती मोदी, पुण्याचा गौरव आर्या अशा आणखी काही अज्ञात आरोपींच्या विरोधात आदेश जारी केले आहेत. ईडीच्या सूत्रांच्या माहितीनुसार गौरव आर्या पुण्यात राहतो पण गोव्यात त्याचा ड्रग्सचा मोठा धंदा सुरु आहे, याचा अधिक तपास एनसीबी टीम करणार आहे.

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोची दिल्ली युनिट या प्रकरणाची चौकशी करत आहे. दिल्लीतील डेप्युटी डायरेक्टर केपीएस मल्होत्रा यांच्या अंडर ही चौकशी सूरु होणार आहे. एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, NDPS ऍक्टच्या कलम 20,22,27,28,29 नुसार खटला दाखल केला आहे. आणखी काही अज्ञात आरोपींच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला आहे.

ईडीला मिळाले होते हे इनपुटस्
एनसीबीच्या सूत्रांच्या माहितीनुसार, अशा लोकांची चौकशी करण्यात येईल ज्यांना ईडीने आपल्या एफआयआर मध्ये आरोपी ठरवलं आहे. ईडीला अशी माहिती मिळाली होती की, रियाचा भाऊ आणि त्याच्या कर्मचाऱ्यांचा संबंध ड्रग माफियांसोबत होता. सुशांतला ड्रग देऊन त्याला मारण्याचा कट रचल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुशांतचे वडील केके सिंह यांचा वकील विकास सिंहने एनसीबीने सुरु केलेल्या चौकशीबाबत आनंद व्यक्त केला आहे. अनेक आरोपींविरोधात तपास सुरू आहे. सुशांत आणि त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळेल अशी आशा आहे. ईडी सोबत आता एनसीबी या चौकशी नंतर अनेक गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता आहे.