गेल्या 6 वर्षात 4 ज्येष्ठ विचारवंतांची ‘हत्या’, ‘असं’ आहे औरंगाबाद ‘कनेक्शन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये गेल्या 6 वर्षांमध्ये 4 ज्येष्ठ विचारवंतांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. यातून समाजात सुरू असलेला दहशतवाद दिसून येतो. 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर, 16 फेब्रुवारी 2015 रोजी कोल्हापूरातच कॉम्रेड गोविंद पानसरे, 30 ऑगस्ट 2015 रोजी धारावाढ येथे डॉ एम. एम. कलबुर्गी आणि 5 सप्टेंबर 2017 रोजी बंगळुरूत पत्रकार गौरी लंकेश यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात आता महाराष्ट्रातल्या औरंगाबदचं कनेक्शन उघड झालं आहे.

पोलिसांना आधीपासूनच संशय होता की, या चारही हत्यांचं कनेक्शन एकच आहे. त्यानुसार, महाराष्ट्र-कर्नाटकमधल्या तपास यंत्रणांनी तपास सुरू केला होता. यापैकी डॉ. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास लागला आहे. तर दाभोळकर आणि पानसरे यांच्या हत्येचा तपास लावण्यात महाराष्ट्र पोलिसांना यश आलेले नाही. गौरी लंकेश यांच्या हत्येचा मास्टराईंड ऋषिकेश देवडीकर उर्फ मुरली याला झारखंडमधील धनबाद येथून अटक केली आहे. कर्नाटक एसआयटीने ही कामगिरी केली आहे. मुरली गेल्या 6 महिन्यांपासून धनबादच्या कतराजमध्ये रहात होता. तो मूळचा महाराष्ट्रातील औरंगाबादचा आहे.

‘असं’ आहे औरंगाबाद कनेक्शन –

गौरी लंकेश हत्या प्रकरणात अटक झालेला ऋषिकेश देवडीकर हा मूळचा औरंगाबादचा आहे. शहरातील एन 9 सिडको भागात तो पतंजलीचे दुकान चालवायचा. आई-वडिल, पत्नी आणि मुलांसह तो रहात होता. जगदीश कुलकर्णी याचं हे दुकान होतं. जगदीशने माहिती दिली आहे की, 2016 मध्ये ऋषिकेशने साहित्यासह दुकान सोडले होते.

शरद केळकर आणि सचिन अंधुरे हेही औरंगाबादचेच –

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात डॉ नरेंद्र दाभोळकरांच्या हत्या प्रकरणात तब्बल 5 वर्षांनी सीबीआयने पुण्यातून सचिन प्रकाशराव अंधुरे याला अटक केली होती. त्याने दाभोळकरांवर गोळ्या झाडल्याचा दावा सीबीआयने केला होता. नालासोपाऱ्यात स्फोटक प्रकरणाचा तपास करताना डॉ. नरेंद्र दाभोळखर हत्या प्रकरणाचे धागेदोरे मिळाले होते. या प्रकरणी अटकेत असलेल्या शरद कळसकर याच्या चौकशीतून सचिन अंधुरेचे नाव समोर आले होते. हे दोघे मित्र आहेत. एटीएसने दोन दिवसांपूर्वीच औरंगाबादमधून सचिनला ताब्यात घेतलं. गुन्ह्यात सहभाग आढळ्यानंतर त्याला अटक करून सीबीआयकडे सोपवण्यात आलं.

शरद आणि सचिन हे औरंगाबादचेच आहेत. शरद केसापुरी गावात तर सचिन कुंवारफल्ली राजाबाजार येथे राहतो. निराला बाजार येथे एका कपड्याच्या दुकानात तो कामाला आहे. त्याला पत्नी, भाऊ आणि एक वर्षाची मुलगी आहे. मे महिन्यातील औरंगाबादमधील दंगलीत त्याचा समावेश होता अशीही माहिती मिळत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/