Narendra Dabholkar Murder Case | डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण ! आरोपींना वकील आणि नातेवाईकांना भेटण्यासाठी न्यायालयाने दिला वेळ, आता ‘या’ तारखेला आरोप निश्चिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Narendra Dabholkar Murder Case | महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील (Narendra Dabholkar Murder Case) आरोपींनी वकील आणि नातेवाईकाना भेटण्यासाठी वेळ मागितल्याने त्यांच्यावरील आरोपी निश्चिती १५ सप्टेंबरपर्यत पुढे ढकलण्यात आली आहे.

वीरेंद्रसिंह तावडे (Virendrasinh Tawde), सचिन अंदुरे (Sachin Andure), शरद कळसकर (Sharad Kalaskar), अ‍ॅड. संजीव पुनाळेकर (Adv. Sanjeev Punalekar) आणि विक्रम भावे (Vikram Bhave) यांच्यावर आज आरोप निश्‍चिती करण्यात येणार होती.
त्यासाठी सचिन अंदुरे, डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, अ‍ॅड. संजीव पुनाळेकर व्हिडीओ कॉन्स्फरनिंगद्वारे उपस्थित होते. विक्रम भावे स्वतः हजर होता. तर पाचवा आरोपी शरद कळसकर अनुपस्थित होता.
या गुन्ह्यात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल केलेल्या दोषारोपपत्रात डॉ. तावडे, अंदुरे,
कळसकर यांच्याविरोधात कट रचणे, हत्या करणे, बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यानुसार (यूएपीए) आरोप ठेवण्यात आला आहेत.
तर अ‍ॅड. पुनाळेकर आणि भावे यांच्याविरोधात पुरावे नष्ट केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहेत.
तावडे, अंदुरे आणि कळसकर हे कारागृहात असून ॲड. पुनाळेकर आणि भावे जामीनावर आहेत.

न्यायालयाने आरोपीना आजच्या सुनावणी दरम्यान गुन्हा कबूल आहे का? असे विचारले असता कोरोनामुळे नातेवाईक आणि वकिलांशी संपर्क साधता आलेला नाही. त्यामुळे मुदत मिळण्याची विनंती आरोपींनी केली. ती मान्य करीत न्यायाधीश एस. आर. नावंदर (Judge S. R. Navander) यांनी 15 सप्टेंबरला आरोपींवर आरोपी निश्चित केले जाईल, असे सांगितले.
मात्र आणखी मुदत वाढ देता येणार नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले.

 

Web Title : Narendra Dabholkar Murder Case | Dr. Narendra Dabholkar murder case! The time given by the court to the accused to meet the lawyer and relatives, now ‘these’ allegations have been confirmed

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

ICRA | ऑगस्टमध्ये वाढली देशांतर्गत हवाई वाहतूक, झाली 31 टक्केची वाढ

OMG ! एकाच मुलासोबत लग्न करण्यासाठी आडून बसल्या दोन मुली, मग टॉस उडवून निवडली वधू!

High Court | प्रेमी युगूलांसाठी खुशखबर ! वधू-वराच्या अनुपस्थितीतही विवाह नोंदणी करता येणार, हाय कोर्टाचा निर्वाळा