‘PAK’चं शेपूट ‘वाकड ते वाकड’चं ! PM मोदींसाठी ‘AirSpace’ खुलं करण्यास ‘नकार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र उघडण्यास नकार दिला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींना पाकिस्तान आपला हवाई मार्ग देणार नाही. कुरेशींनी स्पष्ट केले की भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उड्डाणासाठी आम्ही आमच्या एअर स्पेसचा वापर करू देणार नाही, अशी माहिती आम्ही भारतीय उच्चायुक्तांना दिली आहे.

अमेरिका दौर्‍यासाठी पंतप्रधान मोदींना पाकिस्तानच्या हवाई क्षेत्र वापरावे लागते. पंतप्रधान २१ ते २७ सप्टेंबर दरम्यान अमेरिकेच्या दौर्‍यावर जाणार आहेत. २१ सप्टेंबर रोजी ते भारताहून अमेरिकेला जाणार आहेत. या महिन्याच्या सुरूवातीला पाकिस्तानने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासाठीही हवाई क्षेत्र उघडण्यास नकार दिला होता. पाकिस्तानच्या या हालचालीवर भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले की, पाकिस्तान सरकारच्या व्हीव्हीआयपी विशेष उड्डाणसाठी ओव्हरलाइट क्लीयरन्स नाकारण्याच्या निर्णयाबद्दल आम्ही आपली नाराजी व्यक्त करतो. जे कोणत्याही सामान्य देशाकडून दिले जाते. राष्ट्रपती कोविंद हे पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचा वापर आइसलँड, स्वित्झर्लंड आणि स्लोव्हेनियाच्या प्रवासासाठी करणार होते.

केवळ राष्ट्रपती आणि PM ना बंदी :
पाकिस्तानने हवाई क्षेत्रावर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला नाही, परंतु राष्ट्रपती कोविंद आणि पंतप्रधान मोदी यांच्या विमानांना मान्यता न देण्याचा मानस व्यक्त केला आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यापासून पाकिस्तानचा रोष कायम आहे. या भागात त्यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधान मोदी यांच्यासाठी हवाई क्षेत्र उघडले नाही.

भारताच्या कारवाईनंतर एअरस्पेस बंद करण्यात आले :
पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाल्यानंतर भारतीय वायुसेनेने बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी तळांचा नाश केल्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र बंद केले होते.

Visit – policenama.com